Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे. ही बातमी बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर सध्या शेअर मार्केटमध्ये कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत सोबतच कॉर्पोरेट लाभाची देखील घोषणा केली जात आहे.
कॉर्पोरेट लाभाची होणारी घोषणा गुंतवणूकदारांची लक्ष वेधत आहे. प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडने पण बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली असून या कंपनीने देखील गुंतवणूकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहेत.

या घोषणेनंतर कंपनीचे शेअर चांगलेच फोकस मध्ये आले आहेत आणि यामध्ये तेजी दिसून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 या प्रमाणात आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे.
म्हणजे कंपनीने ठरवलेल्या रेकॉर्ड डेटला ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना एका शेअर मागे एक शेअर बोनस म्हणून मिळणार आहे. नक्कीच कंपनीच्या संचालक मंडळाच्या या निर्णयाचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.
खरे तर दहा ऑक्टोबर रोजीच कंपनीने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. 1:1 या प्रमाणात कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर्स देणार आहे मात्र यासाठीची रेकॉर्ड डेट अजूनही फायनल झालेली नाही.
पण लवकरच कंपनीकडून बोनस इशूची रेकॉर्ड डेट फायनल करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. पण कंपनीच्या या घोषणेनंतर याच्या स्टॉक मध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 10.74 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होते.
खरे तर मागील 365 दिवस या कंपनीच्या शेअर होल्डर साठी सोन्याचे राहिले आहेत. गेल्या एका वर्षामध्ये या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला पाच पट परतावा देण्याची किमया साधली आहे.
म्हणजेच हा एक मल्टिबॅगर स्टॉक आहे आणि आता यात गुंतवणूक करणाऱ्यांना बोनस शेअरचा सुद्धा लाभ मिळणार आहे. कंपनीबाबत बोलायचं झालं तर ही एक NBFC आहे म्हणजे नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी. या कंपनीचे हेड ऑफिस मुंबईत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीची नोंदणी आरबीआयमध्ये तसेच सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीमध्ये झालेली आहे. या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध करण्यात आलेले आहेत.