Soybean Rate : गेल्या अडीच – तीन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये सोयाबीनला साधा हमीभाव सुद्धा मिळालेला नाही आणि यामुळे शेतकरी बांधव प्रचंड अडचणीत आले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पण यंदा परिस्थिती बदलणार असे चित्र तयार होताना दिसतंय आणि यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावर्षी पहिल्यांदाच सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा अधिक झाले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळतोय.

दरम्यान कालच्या मार्केटमध्ये सोयाबीनला तब्बल 8430 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला असून सोयाबीन मध्ये आलेली ही तेजी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. पण आता येत्या काळात सोयाबीनला नेमका काय भाव मिळणार यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
कुठे मिळतोय सोयाबीनला विक्रमी भाव
7 नोव्हेंबरला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला. वाशिम जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेतले जाते आणि येथेच सोयाबीनचे भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनला चांगला भाव मिळतोय. विशेषता बिजवाई म्हणजेच पेरणी योग्य सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसतोय. चांगल्या क्वालिटीच्या बिजवाई सोयाबीनला काल झालेल्या लिलावात तब्बल 8z430 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
बिजवाई सोयाबीनच्या दरात काल एकाच दिवशी क्विंटल मागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. 6 नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनला याच मार्केटमध्ये 7401 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. 7 नोव्हेंबर रोजी हाच दर 8430 रुपये प्रति क्विंटल इतका झाला.
म्हणजे फक्त 24 तासांमध्ये बिजवाई सोयाबीनचे भाव एक हजार रुपयांनी वाढलेत आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळतय. खरे तर सोयाबीनची विजयादशमीपासून आवक सुरू झाली आहे मात्र आता जसजसा हंगाम पुढे जातोय तशी आवकही वाढू लागली आहे.
सात नोव्हेंबर रोजी वाशीमच्या बाजारात 20,000 क्विंटल पेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. यामध्ये बिजवाई सोयाबीनची आवक जवळपास 5000 क्विंटल एवढी असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून मालावर परिणाम झालाय, पण अजूनही बाजारात बिजवाई सोयाबीनची पुरेशी आवक होत आहे. तसेच उच्च दर्जाचे बीजवाई सोयाबीन व्यापाऱ्यांकडून जोरदार खरेदी केले जात आहे.
नक्कीच उच्च दर्जाच्या मालाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत असून येत्या काळात सोयाबीनचे रेट आणखी वाढण्याची शक्यता आहे. निदान यावर्षी तरी सोयाबीनला नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल 9-10 हजार भाव मिळायला हवा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.