Ration Card News : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुरवठा विभागाने राज्यातील काही रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत काय रेशन कार्डधारकांना आता घरपोच धान्य दिले जाणार आहे.
यामुळे गरजू रेशन कार्डधारकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा पुरवठा विभागाकडून एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या अंतर्गत आता जिल्ह्यातील काही रेशन कार्डधारकांना घरपोच धान्य उपलब्ध करून दिले जाणार असून या निर्णयाचा अनेकांना दिलासा मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की रेशनचे स्वस्त धान्य मिळवण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना तसेच वयोवृद्ध लाभार्थ्यांना मोठी फरफट करावी लागते.
मात्र आता या लोकांची अडचण दूर होणार आहे कारण की या नागरिकांना आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून घरपोच धान्य उपलब्ध करून दिले जाणार असून यासाठी एक विशेष अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हा उपक्रम राबवण्यास पुरवठा विभागाकडून नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 594 दिव्यांग आणि 643 वृद्ध नागरिक लाभार्थ्यांच्या कुटुंबांना घरपोच स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे.
या लाभार्थ्यांना प्रशासन स्वतः घरी जाऊन धान्य देणार असल्याने प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाची सगळीकडे प्रशंसा केली जात आहे. खरेतर, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध असते.
प्रत्येक योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाचे प्राधान्य असते. अशातच आता नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना रेशन दुकानांवर जाण्याची गरज पडू नये याकरिता घरपोच धान्य उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरु झाली आहे.
पुरवठा विभागाने स्वस्त रेशन घरपोच देण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना देखील योग्य पद्धतीने लाभ मिळणार आहे.