देशाला मिळणार आणखी एका नव्या बुलेट ट्रेनची भेट ! कसा असणार रूट ?

Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या काही वर्षात सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास वेगवान होणार असून ही बुलेट ट्रेन देशाच्या दळणवळण व्यवस्थेत गेमचेंजर ठरणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.

मुंबई – अहमदाबाद हा एक व्यस्त मार्ग आहे, अशा स्थितीत या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यास नक्कीच प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. अशातच आता जम्मू-काश्मीर साठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरला सुद्धा बुलेट ट्रेन चा लाभ मिळणार आहे.

खरेतर, कटरा ते अमृतसर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. पण या मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता पुढील काही महिन्यात स्थगित करण्यात आली आहे. मार्च 2026 पर्यंत ही गाडी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे साहजिकच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कनेक्टिव्हिटी तात्पुरती प्रभावित झाली आहे. अशातच आता जम्मू-काश्मीरसाठी एक मोठी आणि अगदीच सकारात्मक बातमी समोर आली आहे. जम्मू–अमृतसर दरम्यान बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे.

या दिशेने सरकारने महत्त्वाचे पाऊल पण उचलले आहे. दरम्यान, आता या प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट हाती आलंय. हा हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्प जलद गतीने पूर्ण होणार आहे. कारण याच्या अंतिम अलाईनमेंट डिझाईनसाठी नेशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने निविदा मागवल्या आहेत.

वास्तविक दिल्ली–अमृतसर–कटारा कॉरिडॉरचा उत्तरेकडील विस्तार म्हणून या बुलेट ट्रेन मार्गाकडे पाहिले जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातोय.

या प्रकल्पाशी निगडित अधिकार्‍यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया पूर्ण होताच अंतिम अलाईनमेंट डिझाईनचे काम सुरू केले जाईल. त्यानंतर सविस्तर अभियांत्रिकी आणि बांधकाम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दुसरीकडे प्रकल्पाच्या खर्चाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 75.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, एनएचएसआरसीएलने पात्र कंपन्यांकडून ई-निविदा मागवल्या आहेत. सुमारे 240 किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित कॉरिडॉरमुळे अमृतसर आणि जम्मू दरम्यानचा प्रवास कालावधी निम्म्याने कमी होणार आहे.

पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी हा प्रकल्प अधिक सक्षम करणार आहे. या बुलेट ट्रेनमुळे उत्तर भारताची दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम होईल. अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासासाठी बुलेट ट्रेन प्रकल्प गेम चेंजर ठरेल यात शंकाच नाही.

तज्ञांच्या मते, हा प्रकल्प पर्यटन, व्यापार आणि गुंतवणुकीच्या द़ृष्टीने जम्मू काश्मीर साठी अधिक फायद्याचा राहणार आहे. पंजाब राज्याच्या प्रगतीला देखील यामुळे नवीन पंख फुटणार आहेत.