Pune Metro News : अलीकडे पुणे म्हणजे ट्रॅफिक जॅम आणि ट्रॅफिक जॅम म्हणजे पुणे असं समीकरण बनलय आणि यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न समोर नष्ट करायचा असेल तर काहीतरी खास आणि धोरणात्मक पावलं उचलणे आवश्यक आहे आणि याच अनुषंगाने शासन आणि प्रशासन आपापल्या पातळीवर जोरदार काम करत आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विणले जात असे ज्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य झाले आहे.

दरम्यान पुणे शहरातील मेट्रो मार्गांचा विस्तारही झपाट्याने केला जात आहे. सध्या शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. केला मेट्रो मार्ग म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि दुसरा म्हणजे वनाज ते रामवाडी.
विशेष बाब अशी की या दोन्ही मेट्रो मार्गांच्या विस्ताराचे काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे. दरम्यान 2026 हे वर्ष पुणेकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
खरेतर, स्वारगेट पिंपरी चिंचवड महापालिका या मेट्रो मार्गाचा विस्तारित मार्ग अर्थात पिंपरी ते निगडी या मार्गाचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे.
आतापर्यंत या प्रकल्पाचे एकूण पस्तीस टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत हा मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत येईल अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
सध्या या प्रकल्पाचे काम ज्या वेगाने सुरू आहे ते पाहता पुढील वर्षी नक्कीच हा प्रकल्प पुणेकरांसाठी सुरू होणार आहे. चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक परिसर या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे मेट्रोच्या नकाशावर येणार आहे.
या प्रकल्पासाठी 910 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ह्या मार्गाची लांबी 4.51 किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग एकूण तीन टप्प्यात विभागण्यात आला आहे.
PCMC ते चिंचवड 1.463 किलोमीटर, चिंचवड ते आकुर्डी (1.651 किमी), आकुर्डी ते निगडी (1.062 किमी) आणि निगडी ते भक्ती-शक्ती चौक (0.975 किमी) अशा तीन टप्प्यात हा मार्ग विभागला गेलाय. हा मार्ग पूर्णपणे इलेव्हेटेड असून, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी हा विकसित होतोय.