महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! वर्ष 2026 मध्ये…..

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या पण कुटुंबात कोणी शालेय विद्यार्थी असेल तर नक्कीच ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

खरंतर आज आपण 2026 मध्ये म्हणजेच पुढील वर्षी शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या मिळणार याची यादी पाहणार आहोत. आता 2025 जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या दीड महिन्यांमध्ये या वर्षाची सांगता होईल आणि नवीन वर्षाचा शुभारंभ होणार आहे.

दरम्यान नूतन वर्षाभिनंदनाच्या आधीच आज आपण नव्या वर्षात शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबतची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

आणि आपणास सांगू इच्छितो की पुढील वर्षी शासकीय कर्मचारी, शाळा / महाविद्यालयांना 22 दिवस सार्वजनिक सुट्ट्या मंजूर आहेत.  आता पण याच सुट्यांची अधिकृत यादी पाहणार आहोत.

2026 मध्ये शाळांना किती दिवस सुट्ट्या 

26 जानेवारी 2026 – प्रजासत्ताक दिन निमित्ताने शासकीय कार्यालय तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी राहणार आहे.

15 फेब्रुवारी – रविवार तसेच महाशिवरात्री निमित्ताने या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी राहील.

19 फेब्रुवारी – छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनानिमित्ताने या दिवशी राज्यातील सर्व शाळा अध्यापनासाठी बंद राहतील.

4 मार्च – या दिवशी होळी असल्याने राज्यातील सर्व शाळांना सुट्टी राहील.

20 मार्च – गुढीपाडवा निमित्ताने राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे.

21 मार्च – ईद-उल-फित्र निमित्ताने राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

27 मार्च – रामनवमी निमित्ताने या दिवशी राज्यातील शाळांना सुट्टी राहील.

31 मार्च – महावीर जयंती निमित्ताने राज्यातील शाळा बंद राहतील.

3 एप्रिल- गुड फ्रायडे असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांना सुट्टी राहणार आहे.

14 एप्रिल – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

1 मे – महाराष्ट्र दिन निमित्ताने या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात अध्यापन बंद राहणार आहे.

27 मे – ईद-उल -अधा निमित्ताने राज्यातील शाळा बंद राहणार आहेत.

26 जून – मोहरम निमित्ताने राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे.

15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन होणार नाही. पण शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होईल.

16 ऑगस्ट – या दिवशी रविवार पण आहे आणि पारशी नववर्ष निमित्ताने देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

25 ऑगस्ट – ईद ए मिलाद निमित्ताने राज्यातील शाळा बंद राहणार आहेत.

14 सप्टेंबर – गणेश चतुर्थी निमित्ताने महाराष्ट्रातील शाळा बंद राहतील.

2 ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती निमित्ताने राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

21 ऑक्टोबर – दसरा असल्याने या दिवशी राज्यातील शाळांना सुट्टी राहील. 

9 नोव्हेंबर – दिवाळीनिमित्ताने राज्यातील शाळा या दिवशी बंद राहतील.

24 नोव्हेंबर – गुरुनानक जयंती निमित्ताने राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे.

25 डिसेंबर – नाताळ निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.