FD News : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का मग तुमच्यासाठी बँकांच्या एफ डी योजनेचा पर्याय बेस्ट राहणार आहे. या वर्षात देशभरातील अनेक बँकांनी FD योजनांचे व्याजदर घटवले आहे. आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील बँकांनी फिक्स डिपॉझिट चे व्याजदर कमी केले आहे.
यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी FD करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय. एफ डी मध्ये महिलावर्ग आणि सीनियर सिटीजन ग्राहक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात. पण फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी झाले असल्याने आता एफडीआयची इतर बचत योजनांचा शोध घेतला जातोय.

पण आजही अशा काही बँका आहेत ज्या की आपल्या गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहेत. दरम्यान आज आपण अशाच एका बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. कॅनरा या सरकारी बँकेकडून आपल्या गुंतवणूकदारांना एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे.
या सरकारी बँकेत एक लाखाची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 36 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. खरंतर अनेक जण एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात कारण म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित मिळणारा परतावा.
कॅनरा बँकेची FD योजना बनवणार मालामाल
आज आपण कॅनरा बँकेची एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना कशी आहे याबाबतची माहिती पाहूयात.
एका वर्षाची FD योजना : 365 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कॅनरा बँकेकडून 6.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. अशा स्थितीत यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर एक लाख 6,398 मिळणार आहे म्हणजेच 6398 संबंधित गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
2 वर्षाची FD योजना : दोन वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सुद्धा 6.25 टक्के दराने व्याज दिले जाते. म्हणजेच या बँकेत दोन वर्षांसाठी एक लाखाच्या गुंतवणुकीवर 13,205 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
3 वर्षात किती परतावा मिळणार : जर समजा तीन वर्षांसाठी कॅनरा बँकेत एक लाख रुपयांची एफडी केली तर 6.25 टक्के दराने एक लाख वीस हजार 448 रुपये मिळणार आहेत. अर्थात वीस हजार 448 रुपये व्याज स्वरूपात परत मिळणार आहेत.
5 वर्षात किती परतावा मिळणार : पाच वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 6.25 टक्के दराने एक लाख 36 हजार 354 मिळणार आहेत. म्हणजे 36 हजार 354 व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.