SIP मधून चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर किती वर्ष गुंतवणूक करायला हवी ? तज्ञ सांगतात इतकी वर्ष गुंतवणूक केली तर….

Mutual Fund SIP Tips : गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शेअर मार्केट मधील गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळवून देत आहे. मात्र काही लोकांना शेअर मार्केटमध्ये केलेले गुंतवणूक जोखीम पूर्ण वाढते आणि म्हणूनच ही मंडळी शेअर मार्केट ऐवजी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दिसते.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचे प्रामुख्याने दोन ऑप्शन आहेत. पहिला प्रकार म्हणजे लमसम गुंतवणूक आणि दुसरा प्रकार म्हणजे एसआयपी. म्युच्यूअल फंड्स मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रो म्हणजेच एसआयपी द्वारे गुंतवणूक करून लॉन्ग टर्म मध्ये चांगला मोठा फंड जमा करता येतो.

एसआयपी मध्ये गुंतवणूकदारांना दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवावी लागते. यावर गुंतवणूकदारांना अनिश्चित परतावा मिळतो. म्हणजे कधी जास्त तर कधी कमी परतावा मिळू शकतो. कधी निगेटिव्ह रिटर्न सुद्धा मिळतात यामुळे एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना अनेकदा काही लोक मध्येच एसआयपी बंद करतात.

खरे तर एसआयपी हे शेअर मार्केटचे पुरेसे ज्ञान नसणारे लोक सुद्धा करू शकतात आणि चांगले रिटर्न सुद्धा मिळवू शकतात. परंतु एसआयपी सुरू करताना अनेकजण एसआयपी किती वर्षांसाठी केली पाहिजे? किती वर्षे एसआयपी केल्यानंतर गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळतात असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उपस्थित केले जातात आणि आज आपण याच संदर्भात तज्ञांचे मत समजून घेणार आहोत.

SIP किती वर्ष सुरु ठेवावी?

शेअर मार्केट तज्ञांनी असे सांगितले आहे की शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे पहिल्या एक – दोन वर्षात SIP मधून मिळणारा परतावा नजरेस भरत नाही. अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात निगेटिव्ह रिटर्नचा पण धोका असतो. परंतु हे चढउतार कालांतराने दूर होतात.

यामुळे एसआयपी करायची असल्यास लॉंग टर्म गुंतवणुकीचा विचार ठेवायला हवा. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांमध्ये सिप मधून अपेक्षित परतावा मिळत नाही पण 7-10 वर्षांमध्ये आपोआप शिल्लक राहतात. तज्ञ सांगतात की, 7 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एसआयपी चालवल्याने भांडवली तोट्याचा धोका जवळपास शून्य होऊन जातो.

गेल्या 20 वर्षांत 7 वर्षांहुन अधिक काळासाठी एसआयपी केलेल्या गुंतवणूकदारांना कधीही नकारात्मक परतावा मिळालेला नाही. तसेच यातील सुमारे 81% प्रकरणांमध्ये 10% पेक्षा जास्त वार्षिक परतावा मिळाला आहे. तुम्ही दोन-तीन वर्षांसाठी एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर मिळणारा परतावा हा पूर्णपणे बाजारावर अवलंबून राहणार आहे.

एसआयपी 7 ते 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालू ठेवायला हवी. असे केल्यास चक्रवाढीचा परिणाम स्पष्टपणे दिसतो. समजा एखाद्या गुंतवणूकदाराला एसआयपी वर अवरेज 15% परतावा मिळाला आहे तर त्याला तीन वर्षात पाच हजार रुपयांच्या एसआयपी मधून 2.25 लाख रुपये मिळणार आहेत, पाच वर्षात 4.37 लाख मिळणार आहेत, सहा वर्षात 7.16 लाख मिळणार आहेत आणि दहा वर्षात 13.15 लाख रुपये मिळणार आहेत.

म्हणजे जेवढा जास्त वेळ तुम्ही एसआयपी कराल तेवढा जास्त रिटर्न तुम्हाला यातून मिळणार आहे. खरेतर हिच कंपाऊंडिंगची खरी ताकद आहे. एसआयपीमधून गुंतवणूकदारांना आठव्या वर्षानंतर चांगले प्रॉफिट दिसू लागतात. त्यामुळे एसआयपी करायची असल्यास दीर्घकालीन प्लॅन ठेवा.

अनेक जण दहा वर्षांसाठी एसआयपी केली तर पुरेशी ठरणार का असा प्रश्न विचारतात. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की दहा वर्षे ही सुरुवात चांगली आहे. पण तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी त्यांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी पैसा उभारायचा असेल तर तुम्ही निदान वीस वर्षे एसआयपी केली पाहिजे म्हणजे जेणेकरून एक मोठा फंड त्यांच्या भविष्यसाठी तयार होईल.

थोडक्यात एस आय पी किती वर्ष सुरू ठेवायची या प्रश्नाचे उत्तर तुमचे ध्येयच आहे. तुम्ही केलेली एसआयपी 10 वर्षात तुमचे ध्येय पूर्ण करत असेल तर तुम्ही दहा वर्षे एसआयपी सुरू ठेवा. जर तुमचं ध्येय मोठे असेल तर तुम्ही पंधरा-वीस वर्षांसाठी एसआयपी करा.