2026 बोर्ड परीक्षेपासून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे बक्षीस ! महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने सुरू केला अभिनव उपक्रम

Maharashtra 10th Board : महाराष्ट्र राज्य बोर्डाने अलीकडेच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी जोरदार अभ्यासाला लागले आहेत. अशातच आता 2026 मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे.

आता राज्यातील काही दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे आणि गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना हा एक मोठा दिलासा ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागपूर महापालिकेने महापालिकेच्या शाळांमधून दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या 50 गुणवंत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

या संबंधीत गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणारी 50 हजार रुपयांची रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल. म्हणजेच दोन हप्त्यांमध्ये हे पैसे पात्र विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर होणारच आहे शिवाय त्यांना पुढील शिक्षणासाठी या निधीचा वापर करता येईल.

नक्कीच नागपूर महापालिकेचा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा राहणारा असून यामुळे दहावी बोर्ड परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल सुद्धा वाढणार आहे. नागपूर महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचा लाभ पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे.

त्यामुळे जर तुम्हीही नागपूर महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेत असाल आणि तुम्ही दहावीत असाल तर नक्कीच तुम्ही चांगला अभ्यास करायला हवा जेणेकरून तुम्हाला दहावीत चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्हालाही महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

दहावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी महापालिकेच्या या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली असून या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून तसेच त्यांच्या पालकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकांच्या शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मनपा आयुक्तांनी हे आश्वासन दिले होते आणि आता या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.

नागपूर महापालिकेने दहावी मध्ये चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होणाऱ्या 50 गुणवंत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच मंजूर केला आहे. पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये ज्या बोर्ड परीक्षा होतील त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभही मिळणार आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत दरवर्षी 50 विद्यार्थी लाभार्वित होणार आहेत.