iPhone 17 Price : आयफोन प्रेमींसाठी आज आम्ही एक कामाची आणि अगदीच आनंदाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. आयफोनची नवीन सिरीज लॉन्च होऊन अजून दोन महिने पण झाले नाहीत पण तरीही या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्स सुरू झाली आहे.
आयफोन 17 कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टेक दिग्गज कंपनी एप्पल दरवर्षी आपली आयफोनची नवीन सिरीज लॉन्च करत असते. गेल्या वर्षी कंपनीने iphone 16 बाजारात लॉन्च केला होता आणि यंदा आयफोन 17 मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

आयफोन 17 च्या बेस मॉडेलची म्हणजेच 256 जीबी मॉडेल ची किंमत 82 हजार 900 रुपये इतकी आहे पण तुम्हाला हाच स्मार्टफोन फक्त 35 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून आज आपण याच ऑफरची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ही ऑफर नेमकी कुठे सुरू आहे, या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास काय करावे लागणार ? या सर्व गोष्टी आता आपण समजून घेऊयात.
इथं मिळतोय तगडा डिस्काउंट
तुम्हाला आयफोन 17 कमी किमतीत खरेदी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील युनिकॉर्नच्या स्टोअरला भेट द्या. कारण इथेच तुम्हाला हा आयफोन सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
आयफोन 17 (256 जीबी) ची किंमत 82 हजार 900 रुपये आहे. पण या स्टोअरमधून तुम्ही हा आयफोन खरेदी केला आणि IDFC, SBI किंवा ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला थेट सहा हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे.
या कॅशबॅकमुळे हा फोन तुम्हाला फक्त 76 हजार 900 रुपयांना मिळेल. परंतु ही ऑफर स्टोअरवर लिमिटेड कालावधीसाठी सुरू आहे म्हणून तुम्हाला लवकरात लवकर हा फोन खरेदी करावा लागणार आहे.
विशेष बाब अशी की जर तुमच्याकडे iPhone 15 (256 जीबी) चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्हाला एक्सचेंज बोनस चा लाभ मिळणार आहे. तुमच्या जुन्या आयफोनच्या बदल्यात तुम्हाला या स्टोअर वर 35 हजार रुपयांचा एक्सचेंज व्हॅल्यू दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे तुम्हाला 6000 रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस सुद्धा दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही आयफोन 17 बेसिक मॉडेल फक्त 35 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
पण जर तुम्हाला या ऑफर बाबत डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील युनिकॉर्न स्टोअरला भेट देणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.