शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले टॉप 5 शेअर्स, गुंतवणूकदार बनतील श्रीमंत

Stock To Buy : तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी खास ठरणार आहे. 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आणि जर या वर्षांच्या सरतेशेवटी तुमची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असे टॉप पाच शेअर्स घेऊन आलो आहोत जे की तुम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये प्रचंड नफा देण्याची क्षमता ठेवतात.

महत्त्वाची बाब म्हणजे हे पाचही शेअर्स टॉप ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी सुचवले आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मोतीलाल ओसवाल यांनी हे शेअर्स सुचवलेले आहेत.

त्यामुळे जर तुम्हीही लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल आणि चांगले मजबूत फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांची तुम्हाला निवड करायची असेल तर तुम्ही या शेअर्सबाबत नक्कीच विचार करायला हवा.

विशेष म्हणजे आज आम्ही तुम्हाला जे शेअर सांगणार आहोत ते वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत आणि येत्या काळात या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. 

गुंतवणूकदारांना मिळणार 20% रिटर्न 

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) – भारत इलेक्ट्रॉनिक्स अर्थात बीईएलचा स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतो. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 414.25 रुपये आहे मात्र यासाठीची टारगेट प्राईस 490 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 18 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. नक्कीच येत्या एक – दीड वर्षांमध्ये या स्टॉक मधून जर 18 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी बेस्ट ठरू शकतो. 

Aditya Birla Capital – आदित्य बिर्ला कॅपिटल चे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात असा अंदाज मोतीलाल ओसवालने दिला आहे. यासाठी ब्रोकरेज कडून 380 रुपयांचे टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.

Tata Steel – टाटा समूहात सुरू असणारा वाद अन टाटा समूहाच्या काही शेअर्समध्ये झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय असताना टाटा स्टील एक नवीन आशेचा किरण घेऊन येत आहे. या शेअर साठी 210 रुपयांची टारगेट प्राईस सेट करण्यात आली आहे. येत्या काळात हा शेअर 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज आहे.

रिबिकॉन रिसर्च – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या शेअर्समध्ये नक्कीच गुंतवणूक करायला हवी. ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी 740 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. अर्थात गुंतवणूकदारांना करंट मार्केट प्राइसच्या तुलनेत या शेअर्समधून 18 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज देण्यात आला आहे.  

TVS Motor – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही टीव्हीएस मोटरचा विचार करायला काही हरकत नाही. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी हा स्टॉक फायद्याचा ठरू शकतो. या शेअरची करंट मार्केट प्राइस 3458.60 रुपये एवढी आहे.

पण यासाठी टार्गेट प्राईस 4,159 रुपये निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना येत्या काळात 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.