Mhada News : तुम्हालाही पुण्यात स्वतःचे घर घ्यायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे. आजच हे युग सोशल मीडियाचे युग आहे. सोशल मीडियामुळे सर्वच गोष्टी केवळ एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. मात्र, सोशल मीडियाचा गैरवापर देखील सुरू आहे.
अनेकदा सोशल मीडियामध्ये चुकीची माहिती प्रसारित होते आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. विशेष म्हणजे काही वेळा सोशल मीडियामध्ये प्रसारित होणारी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांमध्येही झळकू लागते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पॉश परिसरात म्हाडा कडून केवळ 28 लाख रुपयांमध्ये घर उपलब्ध करून देण्यात येणार असे वृत्त व्हायरल होत आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे.
पुण्यातील वाकड आणि हिंजवडी हे पॉश परिसर आहेत. हिंजवडी या भागात तर मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. यामुळे या भागातील घरांच्या किमती एक कोटी रुपयांपर्यंत गेलेल्या आहेत.
परंतु पुण्यातील वाकड आणि हिंजवडी सारख्या पॉश परिसरात म्हाडा कडून सर्वसामान्यांना फक्त 28 लाख रुपयांमध्ये घर उपलब्ध करून दिले जाणार असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. या परिसरात घरांच्या किमती 90 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत पण म्हाडा 28 लाखांमध्ये सर्वसामान्यांना घर देणार असा दावा करण्यात आला होता.
त्यामुळे खरंच म्हाडा असा काही प्लॅन बनवत आहे का ? ही लॉटरी नेमकी कधी निघणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात तयार झाले होते. पण आता बाबत म्हाडाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर माहिती दिली आहे.
म्हाडाने काय सांगितले ?
म्हाडा प्राधिकरण हिंजवडी आणि वाकड परिसरात 28.42 ते 28.74 लाख रुपयांमध्ये घर उपलब्ध करून देणार असा दावा काही प्रसार माध्यमांमध्ये करण्यात आला होता. Mhada यशविन आर्बो सेंट्रो या खासगी गृहनिर्माण प्रकल्पात 1 बीएचके आणि 2 बीएचके फ्लॅट्स उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले जात होते.
खरे तर वाकड आणि हिंजवडी सारख्या भागात घरांच्या किमती 80 ते 90 लाख रुपयांच्या घरात आहेत. पण म्हाडा फक्त 28 लाखांच्या रेंजमध्ये घर उपलब्ध करून देणार म्हणून या बातमीची जोरदार चर्चा होणे अपेक्षित होते आणि झाले सुद्धा तसेच.
पण म्हाडाने माध्यमांमध्ये व्हायरल होणारे हे वृत्त साफ खोटे असल्याचे सांगितले आहे. म्हाडाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाची सूचना ! सध्या सोशल मीडियावर म्हाडाच्या नावाने पुणे शहराबाबतीत काही खोट्या सोडती व बातम्या प्रसारित होत आहेत.
कृपया अशा अफवांना बळी पडू नका. म्हाडातर्फे अशी कोणतीही सोडत जाहीर करण्यात आलेली नाही, असे म्हणत म्हाडाने माध्यमांमध्ये व्हायरल होणारी बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अचूक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत पेज ला फॉलो करण्याचे आणि म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://x.com/mhadaofficial/status/1986796953385218208?t=Y3xXJ9ZMm2pZjqgawiHA-g&s=19













