11 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी आणि खाजगी बँकांना सुट्टी जाहीर ! RBI ची मोठी माहिती

Banking News : तुम्हालाही आज-उद्या बँकेशी निगडित कामे करायची आहेत का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर उद्या काही सरकारी आणि खाजगी बँका बंद राहणार आहे. सर्वच बँका बंद राहणार नाहीत पण काही राज्यांमधील बँकांना उद्या आरबीआय कडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उद्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी सिक्कीम राज्यातील बँकांना सुट्टी राहणार आहे. दरम्यान आता आपण सिक्कीम मधील बँकांना सुट्टी राहण्याचे कारण काय आणि राजधानी दिल्ली तसेच महाराष्ट्रातील बँका उद्या सुरू राहणार की बंद राहणार याविषयी माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रात बँका बंद राहणार का?

दरवर्षी 11 नोव्हेंबरला सिक्कीम मध्ये बँकांना सुट्टी असते. सरकारी तसेच खाजगी बँक या दिवशी बंद असतात. आरबीआय ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 11 नोव्हेंबरला सिक्किम राज्यात लबाब डचेन सण साजरा केला जातो आणि यामुळेच या दिवशी सिक्कीम मध्ये बँका बंद असतात.

लबाब डचेन हा सिक्कीम राज्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सिक्कीममध्ये दरवर्षी हा सण उत्साहात साजरा होतो आणि यंदा पण उत्साहात साजरा केला जाणार आहे.

यामुळे येथील बँकांना देखील 11 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर ठाणेसह संपूर्ण राज्यात बँका नियमित सुरू राहतील.

या सणाच्या निमित्ताने देशातील इतर कोणत्याच राज्यांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. दिल्लीमध्ये सुद्धा बँका नियमितपणे सुरू राहणार अशी माहिती आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळाली आहे.