Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळतोय. आज देखील बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. खरे तर गेल्या दोन वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
अगदीच पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पण यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून चांगली कमाई होण्याची आशा पल्लवीत होऊ लागली आहे.

कारण की गत काही दिवसांपासून खुल्या बाजारात सोयाबीनला चांगला दर मिळतोय. चांगल्या क्वालिटीच्या सोयाबीनला सध्या बाजारात मोठी मागणी आहे आणि चांगला भावही मिळतोय.
खरे तर सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र तरीही मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण 10 नोव्हेंबर रोजी सोयाबीनला कोणत्या मार्केटमध्ये सर्वाधिक भाव मिळाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या मार्केटमध्ये मिळाला सर्वाधिक दर
वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती – या मार्केटमध्ये सोयाबीनला कमाल 7500 आणि सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. या बाजारात सोयाबीनला किमान 3975 रुपये असा दर मिळाला आहे. आज इथे एकूण 6000 क्विंटल सोयाबीन आवक झाली होती.
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती – मिळालेल्या माहितीनुसार येथे सोयाबीनला किमान तीन हजार रुपये, कमाल 7,100 रुपये आणि सरासरी 6150 रुपये असा भाव मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती – या बाजारात सोयाबीनला कमाल 7155 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 6955 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. तसेच सरासरी 4000 रूपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती – या बाजारात सोयाबीनला सरासरी 6300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. मात्र किमान दर फक्त 3600 रुपये प्रति क्विंटल असा होता.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती – या बाजारात सोयाबीनला कमाल 6000 रुपये, किमान 5500 आणि सरासरी 5700 रुपयांचा भाव मिळाला.