Milk Side Effects : आपण सर्वजण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो. डॉक्टर सुद्धा दूध पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र दुधाचे सेवन करताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा गंभीर आजाराला निमंत्रण मिळू शकत.
कदाचित तुम्हाला दुधामुळे गंभीर आजार होऊ शकतात हे पटणार नाही पण डॉक्टरांनी स्वतः याबाबत मोठी अपडेट दिली आहे. खरे तर अनेकांना कच्च दूध प्यायला आवडतं. डेरी वरून दूध खरेदी केल्यानंतर ते दूध न उकळताच अनेकजण पीत असतात.

मात्र कच्च दूध सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कच्च्या दुधाच्या सेवनामुळे अनेकदा गंभीर प्रकारच्या संसर्गाचा धोका निर्माण होत असतो यामुळे कोणीही कच्चे दूध पिऊ नये असा सल्ला डॉक्टर देतात.
आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांमधून पसरणारे विविध जीवाणू संसर्गाच्या घटना अलीकडे वाढत आहेत. या संसर्गापैकी ब्रुसेला हे सर्वात सामान्य असल्याच म्हटले जाते. दरम्यान हा गंभीर संसर्ग कच्च्या दुधाच्या सेवनामुळे सुद्धा होऊ शकतो असा दावा डॉक्टरांनी केलेला आहे.
ब्रुसेला हा संसर्गजन्य रोग सामान्यतः दुधाळ जनावरांपासून मानवांमध्ये येतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की काही अभ्यासातून असे लक्षात आले आहे की जगभरातील 14 ते 16 टक्के दुधाळ जनावर ब्रुसेला या गंभीर संसर्गाची लागण झालेली असते.
दरम्यान अशा दुधाळ जनावरांचे दूध कच्चे पिल्यास या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढत असतो. कारण हा संसर्ग दुधाद्वारेही मानवांमध्ये पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे.
बरेच लोक डेअरी वरून दूध खरेदी केले की ते दूध गॅसवर न ठेवता तसेच पितात. अनेक परिवारांमध्ये कच्चे दूध वापरले जात आहे. पण ब्रुसेला हा संसर्ग प्राण्यांच्या दुधाद्वारे सुद्धा पसरतो त्यामुळे कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे.
त्यामुळे तुम्हाला पण कच्चे दूध पिण्याची सवय असेल तर तुम्ही ताबडतोब ही सवय दूर करायला हवी अन्यथा तुम्हालाही गंभीर संसर्ग होण्याचा धोका आहे. थोडक्यात अशा आजारांपासून जर सुरक्षित राहायचे असेल तर कच्चे दूध पिणे टाळून दूध उकळून पिणे फायद्याचे ठरणार आहे.
त्याचवेळी तज्ञांनी पॅकेज्ड दूध असे धोके निर्माण करत नाही असे स्पष्ट केले आहे. तज्ञ सांगतात की पॅकेज्ड दूध पाश्चरायझेशन केलेले असल्याने त्यातून असे धोके निर्माण होत नाहीत.
म्हणजे तुम्ही जर पिशवीचे दूध वापरत असाल तर असा संसर्ग होण्याचा धोका जवळपास नाहीसा होतो. मात्र असे असतानाही आरोग्य तज्ञांनी पिशवीचे दूध सुद्धा उकळूनच प्यावे जेणेकरून कोणताच धोका होणार नाही असे आवाहन केले आहे.













