Kotak Mahindra Bank : बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी अधिक खास करणार आहे कारण की बँकेने आता एसएमएस अलर्ट शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा सर्वसामान्य बँक ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. दरम्यान आता आपण कोटक महिंद्रा बँकेचा हा निर्णय नेमका काय आहे, या एसएमएस अलर्ट शुल्काचा कोणाला फटका बसणार? याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोटक महिंद्रा बँकेचा निर्णय काय?
बँकेने आपला ऑपरेशनल खर्च भागवण्यासाठी आता एसएमएस अलर्ट शुल्क लागू केले आहे. थोडक्यात तुम्हाला बँकेकडून जे एसएमएस मिळतात त्यावर आता बँक शुल्क वसूल करणार आहे.
परंतु हे एसएमएस अलर्ट शुल्क तेव्हाच लागू होईल जेव्हा एका महिन्यात 30 पेक्षा जास्त एसएमएस येतील. म्हणजे कोटक महिंद्रा बँक महिन्याला सुरुवातीचे 30 sms विनाशुल्क पाठवणार आहे.
पण त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक एसेमेस वर बँक ठराविक शुल्क आकारणार आहे. 30 sms ची मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक मेसेज साठी 0.15 रुपये अतिरिक्त एसएमएस अलर्ट शुल्क द्यावे लागणार आहे.
UPI, NEFT, RTGS, IMPS, ATM अशा सगळ्याच व्यवहारांची माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या एसएमएस वर हे शुल्क लागू राहणार आहे.
म्हणजे तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्हाला तुमच्या खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती SMS द्वारे मिळत असेल तर 30 पेक्षा जास्त एसएमएस आल्यावर तुम्हाला अलर्ट शुल्क द्यावे लागणार आहे. पण या अलर्ट शुल्कातून काही लोकांना वगळण्यात आले आहे.
या ग्राहकांना एक पैसा पण द्यावा लागणार नाही
ज्या लोकांच्या सेविंग किंवा सॅलरी अकाउंट मध्ये दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट करण्यात आलेली आहे किंवा शिल्लक आहे अशा लोकांना या एसएमएस अलर्ट शुल्काचा भुर्दंड भरावा लागणार नसल्याची माहिती कोटक महिंद्रा बँकेकडून प्राप्त झाली आहे. म्हणजे तुमच्या खात्यात दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक पैसे असतील तर तुम्हाला हे शुल्क भरावे लागणार नाही.
थोडक्यात कोटक महिंद्रा बँकेचे जे ग्राहक नियमित व्यवहार करतात आणि ज्यांच्या खात्यात नेहमी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे शिल्लक असतात त्यांना या निर्णयाचा कोणताच भुर्दंड बसणार नाही. खरे तर या निर्णयाचा ज्या लोकांचा बँकेतील व्यवहार फारच कमी आहे अशा लोकांना फारसा फटका बसणार नाही.













