BGMI 4.1 Update : BGMI च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही BGMI चे शौकीन असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरेतर Krafton ने BGMI च्या पुढील अपडेटचे सर्व वेळापत्रक जाहीर केले आहे.
क्राफ्टनने भारतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) 4.1 अपडेटची लाँचिंग तारीख आधीचं जाहीर केली आहे. कंपनीने 13 नोव्हेंबर रोजी भारतात BGMI 4.1 अपडेट लाँच केले जाणार अशी मोठी माहिती दिली आहे.

पण आयफोन युजरला आणि अँड्रॉइड युजरला किती वाजेपर्यंत नवीन अपडेट डाउनलोड करता येणार? याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नव्हती. पण आता या नव्या अपडेटच्या वेळापत्रकात याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान आज आपण याच संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तसेच नव्या अपडेट मध्ये युजर्सला कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या संदर्भातही आता आपण माहिती पाहणार आहोत.
उद्या लाँच येणाऱ्या BGMI 4.1 अपडेटमध्ये कंपनी नवीन कंटेंट, सुधारित गेमप्ले वैशिष्ट्ये आणि महत्त्वपूर्ण सिस्टम अपग्रेड युजर साठी उपलब्ध करून देणार अशी माहिती देण्यात आली आहे. आता आपण BGMI 4.1 अपडेट लाँच होण्यापूर्वी यात युजर्सला काय काय मिळणार हे पाहुयात.
नव्या अपडेटमध्ये कोणते फिचर्स मिळणार?
BGMI 4.1 अपडेटमध्ये विंटर सुरू झाला असल्याने विंटर थीम उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये खेळाडूंना कंपनीच्या फ्रॉस्टी फनलँड मोडद्वारे सादर केलेल्या विंटर थीम असलेल्या गेमप्लेचा अनुभव घेता येणार आहे.
या मोडमध्ये, खेळाडूंना पेंग्विन विले आणि पेंग्विन टाउन्समधील बर्फाळ ठिकाणे, बर्फाळ लँडस्केप्स आणि पेंग्विनने भरलेल्या शहरांचा अनुभव सुद्धा घेता येणार आहे. खेळाडूंना या ठिकाणी लूट एरिया पण मिळतील.
या बर्फाळ ठिकाणी लढाई करणे खरेच रोमांचक राहणार आहे. यात खेळाडूंना काही नवीन मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. नव्या अपडेटमध्ये खेळाडू बर्फाळ एरियामध्ये मॅजिक आइस स्केट्स वापरू शकतील.
खेळाडू चार आसनी वाहनातून स्नोबॉल देखील फायर करू शकतील. एक नवीन NPC क्रेस्ट सिस्टम वापरकर्त्यांना सामन्यांदरम्यान टोकन गोळा करण्यास आणि रिडीम करण्यास अनुमती देईल.
या अपडेटमध्ये एरेंजेलसारखे क्लासिक नकाशे हिवाळ्यातील वंडरलँडमध्ये रूपांतरित केले जातील. या हिवाळ्यातील थीममध्ये खेळाडूंना बक्षिसे, पोशाख आणि इतर क्रियाकलापांचा आनंद घेण्यासाठी एक नवीन रॉयल पास देखील समाविष्ट असू शकतो.
किती वाजता अपडेट रोल आऊट होणार?
क्राफ्टन इंडिया म्हणते की BGMI 4.1 अपडेट सकाळी साडे सहा वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे कंपनीने संपूर्ण अपडेट रिलीज वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. या वेळापत्रकानुसार अँड्रॉइड युजर्सला गुगल प्ले स्टोअर वर सकाळी साडेअकरा वाजता अपडेट उपलब्ध होणार आहे.
खरे तर अँड्रॉइड युजर साठी सकाळी साडेसहा वाजता अपडेट रोल आउट केल्या जाणार आहे मात्र संपूर्ण अपडेट हे सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत रोल आउट होणार आहे. आयफोन युजर्स ला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत संपूर्ण अपडेट मिळून जाणार आहे.
आयफोन युजर्स आपल्या ॲप स्टोअर वर जाऊन हे अपडेट सकाळी साडेनऊ वाजता डाऊनलोड करू शकतील. या अपडेटनंतर संपूर्ण एपीके कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 12.30 वाजता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.













