Upcoming Smartphone : नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात का मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. आता स्मार्टफोन मार्केट मध्ये एक नवीन कंपनी एन्ट्री घेणार आहे. स्मार्ट टीव्हीसाठी लोकप्रिय असलेला वॉबल ब्रँड आता स्मार्टफोन सुद्धा बनवणार आहे.
ही कंपनी एका नवीन उत्पादन श्रेणीत प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. भारतीय ब्रँड इंडकल टेक्नॉलॉजीजने नुकतीच याबाबत मोठी घोषणा केली आहे. 19 नोव्हेंबर रोजी ही कंपनी त्यांच्या वॉबल ब्रँड अंतर्गत पहिला स्मार्टफोन लाँच करणार असे वृत्त समोर आले आहे.

दरम्यान कंपनीचा पहिला स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच अमेझॉन इंडियावर फोनचे एक टीझर पेज सुद्धा लाईव्ह झाले आहे. यात स्मार्टफोनच्या डिझाइनची पहिली झलक आणि हार्डवेअरबाबत पण माहिती उघड झाली आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण वॉबलच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये काय खास असेल याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत डिटेल्स?
वॉबलच्या अपकमिंग फोनची मायक्रोसाईट लोकप्रिय ईकॉमर्स साईट Amazon वर लाईव्ह आहे. येथे कंपनीने घोषणा केली आहे की, कंपनीचा पहिला वहिला फोन भारतात 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता लाँच केला जाणार आहे.
टीझर इमेजमध्ये कंपनीने फोनचा बॅक पॅनल दाखवला आहे. यानुसार स्मार्टफोनमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक, मायक्रोफोन, USB-C पोर्ट आणि तळाशी स्पीकर ग्रिल उपलब्ध होणार असे स्पष्ट झालं आहे.
कंपनीने फोनचा फ्रंट लूक देखील दाखवला आहे. फोनला पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. पण, कंपनीने अद्याप या फोनचे नाव जाहीर केलेले नाही.
मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये हा नवीन अपकमिंग स्मार्टफोन वॉबल 1 या नावाने ओळखला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या नव्या स्मार्टफोन मध्ये काही एआय फीचर्स सुद्धा असतील.
यात डॉल्बी सपोर्टसह इमर्सिव्ह साउंड सुद्धा मिळणार आहे. फोनमध्ये शक्तिशाली कॅमेरा पण राहणार आहे. गीकबेंच लिस्टिंगमध्ये आगामी फोनबद्दल काही तपशील उघड झाले आहेत.
हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 5जी चिपसेटसह लॉन्च केला जाणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये कंपनी 8 जीबी रॅम देणार आहे. हा फोन अँड्रॉइड 15 ला सपोर्ट करणार आहे. हा फोन विशेषतः कंटेंट क्रिएटर्स आणि तरुण वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.













