8th Pay Commission : जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. मात्र याचा अधिकृत शासन निर्णय काढण्यासाठी आणि टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यासाठी सरकारला दहा महिने वेळ लागला.
यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये तसेच पेन्शन धारकांमध्ये शासनाविरोधात कमालीची नाराजगी पाहायला मिळाली. पण आता शासनाने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आहे. 3 नोव्हेंबर रोजी हे मान्यता मिळाली असून आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना सुद्धा झाली आहे.

आता या समितीकडून आठव्या वेतन आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले असून ही समिती येत्या काही महिन्यांनी आपला अहवाल सरकारकडे जमा करणार आहे. दरम्यान आता आपण आठव्या वेतन आयोगाबाबतचे आठ नवीन अपडेट कोणते आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट
वेतन आयोगासाठी तीन सदस्य समिती – न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या आठव्या वेतन आयोगाच्या समितीचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. तसेच प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य असतील. तर, पंकज जैन हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
आठव्या वेतन आयोग कधीपासून लागू होणार – प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. यानुसार 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होईल आणि त्यानंतर मग आठव्या वेतन आयोगाची सुरुवात होणार आहे.
एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यात येईल पण प्रत्यक्षात याचा लाभ हा 2027 मध्ये मिळणार आहे. म्हणजेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच आठव्या वेतन आयोगात सुद्धा वेतन आयोगाची थकबाकी दिली जाणार आहे.
समितीचा अहवाल कधी जमा होणार – आठव्या वेतन आयोगासाठी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झालेली समिती पुढील काही महिने युद्ध पातळीवर काम करणार आहे. या समितीला सरकारने फक्त 18 महिन्यांची मुदत दिलेली आहे. म्हणजेच या समितीला 18 महिन्यांच्या कालावधीत आपल्या शिफारशी सरकारला सादर करायच्या आहेत.
पगार किती वाढणार – सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचे वेतन साधारणतः 30 ते 34 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मूळ वेतन व इतर भत्ते वाढतील – आठव्या वेतन आयोगात फक्त मूळ वेतनच वाढणार नाही तर इतर भत्ते पण वाढवले जाणार आहेत. घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता इत्यादी भत्ते वाढवले जाणार आहेत. काही नवीन भत्ते सुद्धा ऍड होतील तर काही जुने भत्ते बंद होण्याची पण शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर किती असणार – आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारक यांना लागू होणारी वेतन वाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा होता. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 राहिल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नव्या आयोगातून पेन्शनधारकांना खरंच वगळले आहे का – आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये पेन्शन धारकांचा उल्लेख नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
पेन्शन धारकांना सरकारने आठव्या वेतन आयोगातून वगळले आहे? असा मोठा आरोप देखील केला जाऊ लागला आहे. मात्र प्रत्यक्षात पेन्शन धारकांना सुद्धा आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी ही ग्वाही दिली आहे.













