‘या’ 5 शेअर्समधून गुंतवणूकदारांना मिळाला जबरदस्त लाभ ! 3 महिन्यातच बनवल लखपती

Published on -

Share Market News : शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा आशादायी चित्र निर्माण झाले आहे. मार्केट परत रुळावर आलंय. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा ओघ फारच कमी झालाय आणि देशांतर्गत गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करत आहेत.

यामुळे शेअर मार्केट तेजीत आहे. दरम्यान या तेजीत काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये पण चांगले रिटर्न दिले आहेत.

अशा स्थितीत आज आपण अशा काही स्टॉकची माहिती पाहणार आहोत ज्यांनी गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

खरे तर, शेअर मार्केट मधील विश्लेषक गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात.

पण असे असतांनाही काही स्मॉल कॅप शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही महिन्यात चांगले रिटर्न देतायेत. आज आपण यापैकीच टॉप 5 शेअर्स ची माहिती पाहणार आहोत. 

हे आहेत जबरदस्त रिटर्न देणारे शेअर्स

Chennai Petroleum Corporation – हा स्मॉल कॅप शेअर आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरलाय. मागील तीन महिन्यात यात गुंतवणूक करणाऱ्यांना 55.44% रिटर्न मिळाले आहेत. ही एक पब्लिक सेक्टरमधील कंपनी आहे.

ही सरकारी कंपनी पेट्रोलियम उत्पादने आणि इतर पेट्रोकेमिकल फीडस्टॉक तयार करण्यासाठी कच्चे तेल शुद्ध करण्याचे काम करते. यात गुंतवणूक करणे शेअर होल्डर्ससाठी लाभदायक ठरले आहे. 

GMDC – जीएमडीसी अर्थातच गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्प कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहेत. गेल्या 3 महिन्यात या Smallcap कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी लाभाचे ठरले आहेत. मागील 90 दिवसात कंपनीच्या शेअर्सने 50% रिटर्न दिले आहेत. 

DCB Bank – प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभाची राहिली आहे. या शेअर्सने गेल्या 3 महिन्यात गुंतवणूक दारांना 33% रिटर्न दिले आहेत. मागील एका वर्षात यात गुंतवणूक करणाऱ्यांना 40% रिटर्न मिळाले आहेत. 

The South Indian Bank – या बँकेचे शेअर्स सुद्धा गुंतवणूक दारांसाठी फायद्याचे राहिले आहेत. या शेअर्सने आपल्या गुंतवणूक दारांना मागील 3 महिन्यात 31% रिटर्न दिले आहेत. 

Swan Defence – मागील 90 दिवसात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सर्वाधिक रिटर्न दिले आहेत. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 178.35% रिटर्न दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe