मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! सरकारच्या निर्णयाने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

Published on -

Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या असंख्य महत्त्वाकांक्षी योजना आहेत. यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुद्धा येते. ही अलीकडेच सुरु झालेली योजना. आता याचबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर, गेल्या शिंदे सरकारच्या काळात योजनेचा शुभारंभ झाला.

या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधी मधील पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असणारी आचारसंहिता संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा पैसा सुद्धा मिळणार आहे. अशातच आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक कामाची अपडेट समोर आली आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

केवायसी प्रक्रियेसाठी सरकारकडून 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून अनेक महिलांना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

कधी सर्व्हर डाऊन होणे, तर कधी ओटीपी न मिळणे अशा समस्या वारंवार येत होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून आता याच संदर्भात फडणवीस सरकारने अगदीच महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केवायसी प्रक्रिया देणाऱ्या अडचणी लक्षात घेता तातडीने हस्तक्षेप करत अगदीच महत्वपूर्ण अन मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही आवश्यक तांत्रिक बदल केले जात आहेत.

त्यामुळे ई-केवायसी प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे. मात्र समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुधारणा सुरू आहेत. तसेच, ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना पण केवायसी करताना अडचणी येत होत्या.

पण आता या अडचणी सुद्धा दूर झाल्या आहेत. मंत्री तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आता ज्या महिलांच्या पतीचा आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा महिलांसाठी वेबसाईटवर विशेष पर्याय जोडला जात आहे.

अर्थात नजीकच्या भविष्यात अशा लाभार्थ्यांना सुद्धा केवायसी करता येणार आहे. अद्याप वेबसाईटवर हे तांत्रिक बदल पूर्ण झालेले नाहीत पण या तांत्रिक बदलांची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe