iQOO 15 Priority Pass : iQOO लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे की कंपनीचा नवा हँडसेट येत्या 26 तारखेला लॉन्च केला जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, iQOO 15 हा फोन 26 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. खरे तर कंपनीने गेल्या महिन्यातच याबाबत माहिती दिली होती. यामुळे अनेक जण या मोबाईलच्या लॉन्चिंग च्या आतुरतेने वाट पाहत होते.

दरम्यान हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. कारण म्हणजे त्याच्या लाँचची वाट पाहणाऱ्या ग्राहकांकडे आता हा फोन खरेदी करण्याचे आणखी एक मोठे कारण आहे.
iQOO ने आज आपल्या ग्राहकांसाठी प्रायोरिटी पास जारी केला आहे. आता तुम्ही म्हणाल ही प्रायोरिटी पास काय भानगड आहे.
तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्रायोरिटी पास व ज्यांच्याकडे असेल त्यांना iQOO TWS 1e इयरबड्स मोफत आणि iQOO 15 फोनवर 12 महिने म्हणजे एक वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार आहे.
iQOO वेबसाइटवर असा पण दावा करण्यात आला आहे की लाँचच्या दिवशी प्रायोरिटी पास असणाऱ्यांना अतिरिक्त फायदे उपलब्ध असतील.
प्रायोरिटी पासची किंमत किती आहे?
कंपनीने X वर याबद्दल एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये सर्व तपशील देण्यात आले आहेत. यानुसार प्रायोरिटी पास ग्राहकांना फोन प्री-बुक करण्याची परवानगी देईल.
या प्रायोरिटी पासची किंमत फक्त 1 हजार रुपये आहे आणि ही रिफंडेबल आहे, म्हणजेच जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव त्याद्वारे iQOO 15 खरेदी करू शकला नाहीत तर तुमचे संपूर्ण पैसे परत केले जातील.
iQOO ने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर देखील या संदर्भात माहिती दिली आहे. X वरील पोस्टमध्ये कंपनीने म्हटले आहे की प्रायोरिटी पास मर्यादित आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ते वितरित केले जातील.
iQOO 15 खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी, हा प्रायोरिटी पास अत्यंत उपयुक्त आहे आणि फोन खरेदी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.












