आयुष्यात एकदा तरी ‘या’ 5 ठिकाणी अवश्य भेट द्या ! ही आहेत भारतातील सर्वाधिक पवित्र तीर्थक्षेत्र

Published on -

Best Spiritual Tourist Spot : तुम्हाला पृथ्वीवरच स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी देशातील सर्वाधिक पवित्र समाजाला जाणाऱ्या पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला हवी.

तुम्हाला प्रवासाची आवड असेल, निसर्गरम्य ठिकाणी फिरणे तुम्हाला आवडत असेल तसेच तुम्हाला मनाला शांतता देणाऱ्या अध्यात्मिक ठिकाणी जाणे पसंत असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप पाच ठिकाणांची माहिती सांगणार आहोत.

तुम्ही या ठिकाणी भेट दिली तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळणार आहे. शिवाय तुम्हाला पृथ्वीवरच स्वर्गासारखा अनुभव देखील मिळणार आहे. 

या टॉप 5 तीर्थक्षेत्राला नक्कीच भेट द्या 

जगन्नाथ पुरी – तुम्हाला भटकंती प्रिय असेल आणि सोबतच देवदर्शनालाही जायचे असेल तर तुम्ही तुमच्या यादीत जगन्नाथ पुरी हे ठिकाण नक्कीच ऍड करा. असे म्हणतात की जगन्नाथ पुरी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर ते एक धाम आहे. धाम म्हणजे असे ठिकाण जिथे साक्षात देवाने वास केलेला असतो.

जगन्नाथ पुरी हे देखील असेच एक धाम आहे. ओडिशा राज्यातील हे ठिकाण प्रभू श्री जगन्नाथाच्या एका विलक्षण स्वरूपासाठी ओळखले जाते. जगन्नाथ पुरी धाम येथे प्रभू श्री जगन्नाथ आपल्या भावंडांसोबत म्हणजेच बलदेव आणि सुभद्रा यांच्यासह विराजमान आहेत.

जगन्नाथ पुरी मंदिरावर फडकणारा ध्वज हा हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो आणि हे या मंदिराचे एक प्रमुख आकर्षण सुद्धा आहे. जगन्नाथ पुरी मंदिरात दिला जाणारा प्रसाद हा अमृततुल्य आहे. आपल्या आयुष्यात आपण जगन्नाथ पुरी येथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी कारण की प्रभू श्री जगन्नाथ हे कलियुगाचे देवता आहेत.

या ठिकाणी गेलात तर तुम्ही येथील प्रसाद ग्रहण करून एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव घेणार आहात. इतर तीर्थक्षेत्रावर तुम्हाला जाणे शक्य असेल तर तुम्ही जा म्हणजे इतर तीर्थक्षेत्रांवर जाणे अनिवार्य नाही पण श्री जगन्नाथ पुरी धामाला भेट देणे आवश्यक आहे. 

अयोध्या – उत्तर प्रदेश राज्यातील श्रीक्षेत्र अयोध्या हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र. श्रीक्षेत्र आयोध्या येथे श्रीरामांचा जन्म झालाय. यामुळे आयुष्यात येथे एकदा भेट देणे आवश्यक आहे. आधी अयोध्येतील रामलाला टेंट मध्ये होते मात्र 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता प्रभू श्री रामराया भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत.

यासाठी शेकडो कारसेवकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हिंदू सनातन धर्मातील लढवय्या लोकांच्या आहुतीने श्री क्षेत्र अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्यात आले असून या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाणे भाग आहे. 

हरिद्वार – हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की आयुष्यात एकदा चारधामचे दर्शन घ्यायला हवे. चार धाम दर्शन घेणाऱ्यांना मोक्ष प्राप्ती होते. दरम्यान, चारधाम जाण्यासाठी हरिद्वार हे पहिले ठिकाण आहे. कारण आपल्याला हरिद्वार मार्गे केदारनाथ-बद्रीनाथला जावे लागते. म्हणून तुम्ही हरिद्वारला नक्कीच भेट द्या. हरिद्वार म्हणजेच स्वर्गाचा मार्ग असे म्हटले जाते. 

बद्रीनाथ – बद्रीनाथ हे चार धामांपैकी एक धाम. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात वसलेले भगवान बद्रीनाथचे धाम देखील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान विष्णू विराजमान आहेत. 

सोमनाथ – हे भगवान शंकराचे मंदिर आहे. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जे गुजरातमधील सौराष्ट्र येथे बांधले गेले आहे. हे पहिले आणि सर्वात पवित्र ज्योतिर्लिंग मानले जाते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe