EPFO कडून कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर ! आता कर्मचाऱ्यांना मिळणार फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज

Published on -

EPFO News : EPFO च्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंट ईपीएफओकडून संचालित केले जाते. पीएफ अकाउंट मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कपात केली जाते तसेच यामध्ये नियुक्त्याकडूनही एक ठराविक रक्कम जमा केली जात असते.

खरेतर, नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेची चिंता असते. उतार वयात हाती पैसा असावा यासाठी सर्वजण अहोरात्र मेहनत घेतात. रिटायरमेंट नंतर कोणाकडेच पैशांसाठी हात पसरावे लागू नये अशी प्रत्येकाची धारणा असते आणि यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो.

कारण योग्य वेळी नियोजन केल्यास म्हातारपण चिंतामुक्त होऊ शकते. दरम्यान ईपीएफओकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

EPFO कडून स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधी (Voluntary Provident Fund – VPF) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. VPF ही अशी योजना आहे जी ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यमान EPF खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करण्याची परवानगी देते.

ही एक पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर योजना आहे. यात कर्मचारी आपल्या पगारातून स्वतःच्या इच्छेनुसार अतिरिक्त योगदान जमा करू शकतो. दरम्यान या अतिरिक्त योगदानावर पण सेम व्याजदर लागू करण्यात आले आहे.

म्हणजेच या जमा रकमेवर कर्मचाऱ्यांना 8.25 टक्के दराने व्याज दिले जाते. हा व्याजदर अनेक बँकांच्या एफडी योजनेच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांनी या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना लॉंग टर्म मध्ये मोठा निधी उभारता येणार आहे.

व्हीपीएफमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या शंभर टक्के रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थोडक्यात कर्मचाऱ्यांचा पगार 25 हजार रुपये असेल आणि त्याला सर्व रक्कम या योजनेत जमा करायचे असेल तर तो ती रक्कम जमा करू शकतो.

यामध्ये गुंतवलेली रक्कम EPF प्रमाणेच सुरक्षित आहे. शिवाय, कर सवलतीचेही मोठे फायदे मिळतात. आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. वार्षिक EPF आणि VPF योगदान 2.5 लाख रुपयांपर्यंत असल्यास व्याजही पूर्णपणे कर-मुक्त असते.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. व्हीपीएफचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टॅक्स-फ्री विड्रॉवल. जर तुम्ही किमान 5 वर्षे योगदान सुरू ठेवले, तर निवृत्तीनंतर काढलेली रक्कम करमुक्त राहते. गुंतवणूक सुरू करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

कर्मचारी आपल्या कंपनीच्या एचआर किंवा पेरोल विभागाशी संपर्क साधून पगारातून अतिरिक्त कपात करण्याची विनंती करू शकतो. ही रक्कम थेट तुमच्या EPF खात्यात जमा केली जाते.

योगदान आणि व्याजाची शिल्लक तुम्ही EPF पासबुक, UMANG ॲप किंवा DigiLocker वरून सहज तपासू शकता. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी VPF हा एक विश्वासार्ह आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक बेस्ट आणि सुरक्षित पर्याय ठरतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe