Mhada Mumbai : तुम्हाला पण राजधानी मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. खरंतर म्हाडा मुंबई मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील काही सोडतीमध्ये रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीसाठी आता विशेष लॉटरी काढली जाणार आहे.
मुंबई मंडळ जवळपास 125 घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करणार आहे. म्हणजे ज्या अर्जदारांचा पहिला अर्ज येईल त्या पात्र अर्जदाराला घराचा लाभ दिला जाणार आहे.

दरम्यान यासाठी ची जाहिरात लवकरच येणार आहे. मुंबई मंडळाने या जाहिरातीसाठी ची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता राहणार आहे ती म्हणजे फक्त दोन कागदपत्रे दिली तरी देखील घर मिळणार आहे.
म्हणजे जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. ज्या अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल त्याला प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध होणार आहे.
मात्र या 125 घरांमधील काही घरे ही सामाजिक आरक्षण अंतर्गत राखीव ठेवली जाणार आहेत. दरम्यान या सामाजिक आरक्षण अंतर्गत राखीव घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा सादर करावे लागणार आहे.
या भागातील घरांसाठी सोडत निघणार
मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा मुंबई मंडळ ताडदेव वडाळा तुंगा पवई आणि अन्य काही ठिकाणच्या विक्री विना पडून असलेल्या घरांची या लॉटरीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्री करणार आहे.
खरंतर या संबंधित भागातील घरांसाठी म्हाडा मुंबई मंडळाकडून दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लॉटरी करण्यात आली आहे पण नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता अखेरकार ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विकण्याचा निर्णय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्री विना पडून असलेले जवळपास 125 घरे मुंबई मंडळाच्या पणन विभागाने शोधून काढली आहेत आणि यातील बहुतांशी घरे मध्यम आणि उच्च गटातील आहेत.
दरम्यान या घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच याची जाहिरात काढली जाणार आहे. स्वतः मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लवकरच या घरांच्या किमती निश्चित होतील अशी माहिती दिलेली आहे.













