Pine Labs Share Price : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरेतर काल फिजिक्स वाल्याच्या आयपीओ चा शेवटचा दिवस होता. मात्र गुंतवणूकदारांनी याकडे दुर्लक्ष केलेले पाहायला मिळाले.
गुंतवणूकदारांनी फिजिक्स वाल्याच्या आयपीओ मध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. तर दुसरीकडे पाइन लॅब्सने चांगली लिस्टिंग मिळवली आहे. खरेतर पाइन लॅब्सच्या आयपीओची जोरदार चर्चा झाली होती.

पाइन लॅब्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईवर 242 ला सूचीबद्ध झाले, ज्याची इश्यू किंमत 221 होती. या मजबूत लिस्टिंगनंतर, स्टॉकमध्ये जोरदार वाढ दिसून आली.
सुरुवातीच्या व्यवहारात याच्या शेअर्समध्ये 25% वाढ झाली आणि सध्या तो 275 वर वर व्यवहार करत आहे. पाइन लॅब्सचा आयपीओ 7 ते 11 नोव्हेंबर दरम्यान सुरू झाला, ज्याची इश्यू किंमत 221 रुपये होती.
आयपीओचा आकार 3 हजार 900 कोटी होता, ज्यामध्ये नवीन इश्यू 2080 कोटी होता आणि विक्रीसाठी ऑफर 1820 कोटी होती. आयपीओला एकूण 2.48 पट सबस्क्रिप्शन मिळाले.
क्यूआयबी (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स) श्रेणीला 3.97 पट सबस्क्रिप्शन मिळाले, तर रिटेल श्रेणीला 1.27 पट सबस्क्रिप्शन मिळाले. आता आपण याच्या आयपीओ ची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Pine Labs IPO डिटेल्स
इश्यू ओपन : 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर
प्राईस बँड : 210 – 221 प्रति शेअर
लॉट साईज : 67 शेअर्स
इश्यू आकार : 3899.91 कोटी (2080 कोटींचा नवीन इश्यू आणि 1819.91 कोटींचा ओएफएस समाविष्ट आहे)
वाटप : 12 नोव्हेंबर 2025
कंपनी काय काम करते ?
पाइन लॅब्स ही एक आघाडीची फिनटेक कंपनी आहे जी तिच्या डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स आणि मर्चंट नेटवर्किंगसाठी ओळखली जाते. गिफ्ट कार्ड आणि प्रीपेड कार्ड विभागात कंपनीचा 90% बाजार हिस्सा आहे.
तिचे कामकाज भारतासह मलेशिया, युएई आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये पसरलेले आहे. पाइन लॅब्स दोन प्रमुख व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहे.
डिजिटल पायाभूत सुविधा व व्यवहार प्रक्रिया, Issuing व Acquiring प्लॅटफॉर्म. कंपनी सबस्क्रिप्शन, व्यवहार/प्रक्रिया शुल्क, एकत्रीकरण शुल्क आणि परवाना शुल्क यामधून महसूल निर्माण करत असते.













