Muthoot Finance च्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी तेजी, 12 महिन्यात गुंतवणूकदारांना मिळालेत 110% रिटर्न

Published on -

Muthoot Finance Share Price : मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी तसेच गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुथूट फायनान्सचे शेअर्स पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत.

मागील बारा महिन्यांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. सोन गहाण ठेऊन कर्ज देणाऱ्या मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये आता पुन्हा वाढ झाली आहे. आज शुक्रवारी मुथूट फायनान्सचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर या शेअर्समध्ये नऊ टक्क्यांची मोठी वाढ पाहायला मिळाली. आज या कंपनीचे शेअर्स 3727 रुपयांवर पोहोचले. अर्थात मुथूट फायनान्सचे शेअर्स 52 वीक हायवर पोहोचलेत.

खरे तर कंपनीने अलीकडे सप्टेंबर ती माहिती निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर तिमाहीतील निकाल फारच दमदार आणि प्रभावी पाहायला मिळतायेत. याच प्रभावी निकालांनंतर आता शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

सप्टेंबर 2025 च्या तिमाहीत मुथूट फायनान्सचा नफा जवळजवळ दुप्पट झाला. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मुथूट फायनान्स लिमिटेडचा नफा जवळजवळ दुप्पट झाला आहे. जुलै-सप्टेंबर 2025 या तिमाहीत कंपनीने 2345 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत मुथूट फायनान्सने 1251 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात वार्षिक आधारावर 59% वाढ झाली आहे. सप्टेंबर 2025 च्या तिमाहीत कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 3992 कोटी रुपये होते.

गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 2519 कोटी रुपये होते. कंपनीच्या संचालक मंडळाने 500 कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीला सुद्धा मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक तेजीत आले आहेत. 

मुथूट फायनान्सच्या शेअरची कामगिरी 

मुथूट फायनान्सच्या शेअर्सने गेल्या काही महिन्यांमध्ये चांगले रिटर्न दिले आहेत. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 365 दिवसातचं जवळपास दुप्पट केले आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 110% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 14 नोव्हेंबर 2024 रोजी मुथूट फायनान्सचे शेअर्स 1777.70 रुपयांवर होते. 14 नोव्हेंबर 2025 रोजी बीएसईवर कंपनीचे शेअर्स 3727 रुपयांवर पोहोचले.

तसेच गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी आत्तापर्यंत मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 69 टक्के रिटर्न मिळाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News