Capillary Technologies IPO : कॅपिलरी टेक्नॉलॉजीजचा Initial Public Offering म्हणजे आयपीओ आज ओपन झाला. अर्थात याच्या IPO साठी सबस्क्रिप्शन विंडो आज उघडली आहे. कंपनीने 532 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल (ओएफएस) आणि 345 कोटीचे नवीन इश्यू आणले आहे.
दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांच्या माध्यमातून या आयपीओ बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न उभा होत आहे.

खरेतर केपीलरी टेक्नॉलॉजी या नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेचा एक महत्त्वाचा भाग क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात गुंतवणार अशी माहिती समोर आली आहे.
आयपीओनंतर प्रवर्तकांचा हिस्सा 67.2% वरून 51.5% पर्यंत कमी केला जाईल, जो कंपनीचा सार्वजनिक गुंतवणुकीसाठी अधिक खुला दृष्टिकोन दाखवत आहे.
पण यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार की तोट्याचे? कोणत्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक करायला हवी याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.
कंपनीचे कामकाज कसे आहे?
या कंपनीचं बिजनेस मॉडेल सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस स्वरूपाच आहे. कंपनीची सुरुवात 2012 मध्ये झाली. कंपनी सॉफ्टवेअर एज अ सर्विस यावर आधारित उत्पादने आणि सोल्युशन विकत असते.
हे सोल्युशन कस्टमर लॉयल्टी, रिवॉर्ड्स व्यवस्थापन, गुंतवणूक आणि भविष्यसूचक विश्लेषण यासारख्या क्षेत्रात मोठ्या उद्योगांना सक्षम बनवतात. सप्टेंबर 2025 पर्यंत, कंपनीकडे 47 देशांमधील 410 ब्रँडना समर्थन देणारे 730 हून अधिक कर्मचारी आहेत.
कंपनीच्या प्रमुख बाजारपेठा रिटेल, बँकिंग-वित्त आणि आरोग्यसेवा क्षेत्रे आहेत, जी तिच्या उत्पन्नाच्या अंदाजे दोन तृतीयांश उत्पन्न देतात. तिच्या ग्राहकांमध्ये प्यूमा, अॅसिक्स, अॅबॉट सिंगापूर, डोमिनोज, इंडिगो, पॉलीकॅब आणि गो कलर्स सारखे प्रमुख ब्रँड समाविष्ट आहेत.
गुंतवणूक करावी की नाही?
आर्थिक वर्ष 2023 पासून आतापर्यंत कंपनीने चांगली ग्रोथ दाखवलेली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल फक्त 156 कोटी रुपये होता. मात्र आर्थिक वर्ष 2025 मध्ये 481 कोटी रुपये झाला आहे.
कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये 13.3 कोटी रुपयांचा नफा झाला पण त्याचा आर्थिक वर्षाच्या पहिल्या सामायिक कंपनीला सहा ते सात कोटी रुपयांचा तोटा सुद्धा सहन करावा लागला होता. कंपनीचा EBITDA मार्जिन FY25 मध्ये 13% होता, जो SaaS कंपनीसाठी वाजवी मानला जातो.
पण, नेट वर्थवर मिळणारे रिटर्न फक्त 2.9% आहे, जे की जागतिक सॉफ्टवेअर उत्पादन कंपन्यांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. कंपनीच्या नफ्यातील चढ-उतार प्रामुख्याने मागील वर्षांमध्ये केलेल्या अधिग्रहणांच्या अमोरटाइजेशनमुळे झाले आहेत.
दरम्यान ही कंपनी सध्या वाढीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नफा मर्यादित आणि अस्थिर आहे. म्हणूनच आर्थिक वर्ष 2025 च्या नफ्यावर आधारित तिचा किंमत-ते-कमाई (P/E) गुणोत्तर बराच जास्त आहे, सुमारे 350. किंमत-ते-विक्री गुणोत्तर सुमारे 10 आहे.
भारतात अनेक सूचीबद्ध SaaS उत्पादन कंपन्यांच्या कमतरतेमुळे तुलना करणे कठीण आहे, परंतु मूल्यांकन जास्त असल्याचे म्हणणे सुरक्षित आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर अशा गुंतवणूकदारांसाठी आणि विशेषता जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ आकर्षक ठरणार आहे. पण स्थिरता आणि नियमित नफा मिळवू इच्छिणाऱ्यांनी सावधगिरी बाळगायला हवी असा सल्ला देण्यात आला आहे.











