Airless Tyres : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. देश वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ग्रो करतोय. ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये देखील भारताने मोठी प्रगती केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची इंट्री होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईलचे सेक्टर अधिक आधुनिक आणि प्रगत झाले आहे.
दरम्यान आज आपण ऑटोमोबाईल सेक्टरमधील एका नव्या तंत्रज्ञानाची माहिती पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्ही ट्यूबलेस टायर बाबत ऐकलं असेल, पाहिलं असेल, त्याचा वापर केला असेल पण आता भारतात प्रथमच नवीन एअरलेस टायरची एन्ट्री झाली आहे आणि या एअरलेस टायरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

देशात आता टायरमध्ये एक नवीन, प्रगत तंत्रज्ञान उदयास आले आहे आणि ते आहे एअरलेस टायर्स. आता सुरक्षितता, सुधारित कामगिरी आणि कमी देखभाल ही सर्वसामान्य कुटुंबियांचे प्राथमिक प्राधान्ये बनले आहे.
एअरलेस टायर्स फक्त मोटरसायकल साठी नाही तर मोठ्या वाहनांसाठी सुद्धा आहेत. अशा स्थितीत आज आपण एअरलेस टायर्स चे फायदे तसेच तोटे आणि एअरलेस टायर्स च्या किमती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एअरलेस टायरचे तोटे
खडबडीत रस्त्यांवर प्रवास करताना अधिक धक्के बसणार आहेत. कारण या टायर्सचा रस्त्याशी जास्त संपर्क येतो. या टायरचा वापर केला तर मायलेज मध्ये सुद्धा कपात होणार आहे. खरेतर, एअरलेस टायर असणारे वाहन पुढे नेण्यासाठी जास्त ड्रॅग करावे लागते.
यामुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी जलद संपते आणि रेंज कमी होते. पेट्रोल किंवा डिझेल वाहनांमध्ये इंधन कार्यक्षमता अर्थातच मायलेज कमी होऊ शकते. हे टायर्स रस्त्यावर सतत घासले जातात म्हणून गाडी चालवताना कंपन वाढू शकते.
इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिनचा आवाज नसतो, म्हणून ट्रिक कार मध्ये तर या कंपनचा आणि टायरचा आवाज अधिक ऐकू येणार आहे. यामुळे ही बाब थोडीशी इरिटेटिंग वाटू शकते.
एअरलेस टायरचे फायदे
सर्वात मोठा फायदा म्हणजे या टायर्स मध्ये हवा भरावी लागत नाही, म्हणून हवा कमी होणे, पंचर होणे, टायरचा ब्लास्ट होणे अशा समस्या नसतील. या टायर्समध्ये हवेऐवजी खास डिझाइन केलेले रबर स्पोक आणि बेल्ट वापरले जातात, जे टायरला ताकद आणि आकार देतात.
यामुळे नुकसान आणि पंक्चर होण्याचा धोका कमी होतो. ह्या टायर्सच इंटिरियर स्ट्रक्चर उघड्या डोळ्यांनी पाहता येते. यामुळे हे टायर्स दिसायला छान वाटतात. या टायर्ससाठी शून्य मेंटेनन्स आहे.
विशेष म्हणजे हे टायर टाकलेत की तुम्हाला सतत हवा चेक करत राहावे लागणार नाही. जे लोक लॉंग ड्राइविंग करतात, ऑफ रोड प्रवास ज्यांना सतत करावा लागतो त्यांच्यासाठी हे टायर्स उत्तम ठरतील.
किंमत काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय मार्केटमध्ये एअरलेस टायरची किंमत साधारणता दहा हजार ते वीस हजार रुपये एवढी आहे. म्हणजेच ट्यूबलेस टायरच्या तुलनेत हे टायर फारच महाग आहेत.
खरंतर हे तंत्रज्ञान भारतात तरी नवं आहे अन यामुळे सध्या या टायरची किंमत अधिक आहे जेव्हा हे तंत्रज्ञान जुने होईल तेव्हा टायरच्या किमती नक्कीच कमी होणार आहेत.












