Khesari Lal Yadav Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा शिक्का चालला. आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या 243 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आत्तापर्यंत एनडीआघाडीला प्रचंड यश मिळाले आहे.
NDA आघाडीने 200 प्लस जागांवर झेंडा गाडला आहे. त्याचवेळी इंडिया गटबंधन पूर्णपणे अडचणीत सापडले आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश बाबू चे सरकार येणार आहे.

भाजपाच्या सूत्रांनी देखील नितेश कुमार हेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होतील हे क्लियर केले आहे. खरे तर मागे बिहारमध्ये भाजपा देवेंद्र फडणवीस शोधत आहेत अशा चर्चा सुरू होत्या म्हणजेच भाजपाला बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे अशा चर्चामागे रंगल्या होत्या.
मात्र यावेळी नितीश कुमार यांच्या जेडीयुला देखील कमी जागा मिळालेल्या नाहीत. शिवाय केंद्रात देखील भाजपाला कुबड्यांची आवश्यकता आहे. यामुळे यावेळी तरी नितेश कुमार हेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत.
खरेतर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी महाआघाडीमध्ये चुरशीची स्पर्धा झाली पण यात जेडीयु आणि भाजपा प्रणित एनडी आघाडीने जबरदस्त यश मिळवले आहे. ह्या दोन्ही आघाडींनी प्रत्येक जागेवर लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रत्येक जागा महत्त्वाची सुद्धा आहे.
पण, काही विधानसभा जागांवर केवळ बिहारमध्येच नव्हे तर बिहारबाहेरही चर्चा होत आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशा काही जागांची जोरदार चर्चा आहे आणि त्यातीलच एक सर्वाधिक चर्चेची जागा म्हणजे छपरा विधानसभा मतदारसंघ.
छपरा विधानसभा मतदारसंघात खेसारी लाल यादव हे आरजेडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. खेसारीच्या उमेदवारीमुळे ही जागा आणखी चर्चेत आली आहे. ही जागा एनडीएमधील भाजपला देण्यात आली आहे, जिथे पक्षाने छोटी कुमारीला उमेदवारी दिली आहे.
या जागेवर खेसारीलाल आणि छोटी कुमारी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. खेसारी लाल यादव पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, पण ते बिहारसाठी किंबहुना भारतासाठी अनोळखी नाहीत. त्यांचे फॉलोवर्स संपूर्ण भारतात पसरलेले आहेत.
बिहारमध्ये देखील खेसारी लाल यादव यांचा एक मोठा चाहतावर्ग पहायला मिळतो. भोजपुरी लोकांचे केंद्रस्थान असलेल्या छपरा येथे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव यांचे खरे नाव शत्रुघ्न यादव आहे.
विशेष म्हणजे, सुरुवातीला त्यांची पत्नी चंदा देवी या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, परंतु शेवटच्या क्षणी आरजेडीने खेसारी लाल यादव यांना तिकीट दिले. खरेतर छपरा विधानसभा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा गड. हा भाजपचा बालेकिल्ला.
येथे भाजप 2010 पासून सत्तेत आहे. छपरा विधानसभेचा आमदार हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचाच आहे. पण यावेळी खेसारी लाल यादव हे निवडणुकीच्या रिंगणात आलेत आणि यामुळे चित्र काहीस बदलणार असं वाटत होतं.
मात्र सध्या स्थितीला खेसारी लाल यादव हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापेक्षा काही हजार मतांनी पिछाडीवर आहेत आणि यामुळे ते थोडे उद्भिग्न झालेले पाहायला मिळतायेत. भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या छोटी कुमारी ह्या मतदारसंघासाठी नवख्या आहेत.
मात्र राजकारण त्यांच्या अंगात आहे. कारण की त्या जिल्हा परिषद अध्यक्ष राहिल्या आहेत. तसेच छोटी कुमारी यांचे पती धर्मेंद्र साह हे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुद्धा आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या वैश्य समुदायातून येतात.
भारतीय जनता पक्ष नेहमीच वेगवेगळ्या फॅक्टर वर विचार करते. तिकीट देताना व्यक्तीच्या कार्यक्षमतेसोबतच कास्ट फॅक्टर सुद्धा तपासले जातात. यानुसार भाजपाने वैश्य समुदायातून येणाऱ्या छोटी कुमारी यांना छपरा विधानसभा मतदारसंघाचे तिकीट दिले.
कारण की या मतदार संघात वैश्य समुदायाची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान आत्तापर्यंतचे चित्र पाहिलं असता भाजपाचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे कारण की खेसारी लाल यादव सद्यस्थितीला पिछाडीवर आहेत. छोटी कुमारी हे या जागेवर सात हजाराहून अधिक मतांनी लीडवर आहेत.












