रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला दिली मोठी भेट! या शहरांमधून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?

Published on -

Maharashtra Railway : रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली आहे. यामुळे राज्यातील तब्बल तीन दशकांचा प्रश्न निकाली निघाला आहे. तीस वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या एका महत्त्वपूर्ण मागणीला अखेरकार रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे.

तीन दशकांपासून रखडलेला एक महत्त्वाचा विषय मार्गी लागला असल्याने आता राज्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाने मुंबई – बेंगलोर दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

खरे तर ही एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात होती. या मागणीसाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. यासाठी विविध प्रवासी संघटनांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जातो.

अखेरकार रेल्वे प्रशासनाकडून या पाठपुराव्याची दखल घेण्यात आली असून आता मुंबई बेंगलोर नव्या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबई – बेंगलोर दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मात्र ही गाडी प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खरंतर तीस वर्षांपासून हा विषय भिजत पडला होता.

यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये शासनाविरोधात तसेच रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी होती. मात्र उशिरा का होईना पण रेल्वे मंत्रालयाने मुंबई बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेसला मंजुरी दिली असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही गाडी मिरज मार्गे चालवण्यात येणार आहे. खरे तर या एक्सप्रेस ट्रेनसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची गरज अधोरेखित केली.

ही गाडी कशा पद्धतीने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरू शकते आणि यामुळे कशा पद्धतीने विकासाचे द्वार खुले होऊ शकतात या संदर्भात प्रल्हाद जोशी यांनी रेल्वे मंत्र्यांना पटवून दिले आणि अखेर रेल्वे मंत्र्यांनी या गाडीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

यानुसार आता रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई-बेंगलोर एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी मिळाली आहे. नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी आणि दावणगिरी या जिल्ह्यांना थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.

या नव्या गाडीमुळे बेळगाव आणि सांगली मिरज भागातील प्रवाशांना सुद्धा एक नवा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण ही गाडी नेमकी कधी सुरू होणार, याचे वेळापत्रक कसे राहणार याची अधिकृत तारीख अजूनही समोर आलेली नाही.

परंतु रेल्वे मंत्रालय याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच माध्यमांनी मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस डिसेंबर पासून सुरू होणार असा अंदाज असल्याची माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe