Vivo S50 आणि S50 Pro Mini ‘या’ तारखेला लाँच होणार ! समोर आली मोठी अपडेट

Published on -

Vivo Smartphone : नवा फोन घेण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच विवो आपले दोन नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून Vivo S50 सीरिज बाबतची माहिती सतत समोर येत आहे.

दरम्यान आता ताज्या अहवालात या सीरिजच्या लाँच टाइमलाइनबद्दल एक महत्वपूर्ण अपडेट शेअर करण्यात आले आहे. खरेतर या सीरिजचे Vivo S50 आणि Vivo S50 Pro Mini हे दोन हँडसेट या महिन्यात लाँच होणार अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती.

पण आता असे स्पष्ट होत आहे की या महिन्यात हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होणार नाहीत. या दोन्ही स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट आता थोडी पुढे सरकल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लॉन्च होणार आहेत.

मात्र अद्याप डिसेंबरच्या कोणत्या तारखेला हे स्मार्टफोन ग्राहकांसाठी लॉन्च होतील याबाबत कोणतीच ठोस माहिती हाती आलेली नाही. दरम्यान आज आपण या दोन्ही अपकमिंग स्मार्टफोन बाबत डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत 

कसे असतील नव्या स्मार्टफोनचे फिचर्स? 

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने यापूर्वी अशी बातमी दिली होती की, Vivo नोव्हेंबर महिन्यात त्यांची नवीन S50 सीरिज लाँच करण्याची शक्यता आहे. पण, आता नवीन रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की नवीन सिरीज डिसेंबर महिन्यात चीनमध्ये लॉन्च होणार आहे.

या सीरिजमध्ये Vivo S50 आणि Vivo S50 Pro Mini हे दोन मॉडेल लॉन्च केले जाणार अशी माहिती समोर आली आहे. कंपनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस या फोनचे टीझर जारी करणार अशी अपेक्षा आहे.

याचा अर्थ ब्रँड आता अपकमिंग स्मार्टफोनच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीजला गती देण्याची शक्यता आहे. नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स बाबत बोलायचं झालं तर Vivo S50 मध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59-इंचाचा OLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.

स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेटद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. बॅटरी आकाराचे तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, परंतु ते 90W जलद चार्जिंगला समर्थन देण्याची अपेक्षा आहे. कॅमेरा सेटअपमध्ये पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश असू शकतो.

तसेच Vivo S50 Pro Mini हे या सीरिजमधील कॉम्पॅक्ट मॉडेल असेल. त्यात 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31-इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. मिनी मॉडेल स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसरवर चालणार आहे.

यामुळे या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स चांगला दमदार राहण्याची अपेक्षा आहे. रिपोर्ट्सनुसार, या मॉडेलची बॅटरी 6040 mah पेक्षा मोठी असू शकते. कॅमेऱ्याच्या बाबतीत, हा फोन फ्लॅगशिप-ग्रेड पेरिस्कोप कॅमेरासह बाजारात येणार आहे.

ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत, दोन्ही आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतील. रिपोर्ट्सनुसार डिसेंबर महिन्यात चीनमध्ये लॉन्च होणारी Vivo S50 सीरिज ग्लोबल मार्केटमध्ये वेगळ्या ब्रँडिंगसह लॉन्च होणार आहे.

ग्लोबल मार्केटमध्ये ही सिरीज Vivo V70 या नावाने लॉन्च होणार आहे. भारतात सुद्धा याच नावाने ही सिरीज लॉन्च केली जाणार अशी शक्यता आहे. मात्र ही सीरिज सुरुवातीला चीनमध्ये लॉन्च होईल आणि त्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्चिंगची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe