Maharashtra Schools : सध्या संपूर्ण राज्यात दहावी आणि बारावी परीक्षेचा फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून अलीकडेच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशातच, आता बारावी बोर्ड परीक्षेतील काही विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
राजधानी मुंबईतील करी रोड येथे स्थित व्ही.व्ही.के. शर्मा ज्युनिअर कॉलेज कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. दरम्यान हे जुनियर कॉलेज बंद झाले असल्याने या जुनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बारावीच्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.

कारण की, या विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाहीये. जुनिअर कॉलेज बंद झाले असल्याने या कॉलेजमध्ये शिकणारे 100 हुन अधिक विद्यार्थी बोर्ड परीक्षेला मुकणार असे चित्र तयार होत आहे.
या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी – मार्च 2026 मध्ये मध्ये होणाऱ्या बोर्ड एक्झाम साठी फॉर्म भरता येत नसल्याने त्यांना परीक्षेलाच बसता येणार नाही अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या बंद झालेल्या ज्युनिअर कॉलेजमधील अनेक विद्यार्थी मागील दोन-तीन वर्षात एक दोन विषयात नापास झाल्यामुळे पुन्हा बारावीची परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण हे विद्यार्थी नियमित विद्यार्थी आहेत.
यामुळे त्यांना खाजगी मध्ये फॉर्म भरता येणार नाही. बोर्डाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार त्यांचे फॉर्म कॉलेज मार्फतच भरावे लागणार आहेत. मात्र, आता मुंबईमधील हे कॉलेज बंद झाले असल्याने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा ठप्प पडलेली आहे.
फॉर्म भरण्याची शेवटची मुदत जवळ येत असल्याने आता या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज कॉलेजच्या चकरा मारत आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणताच प्रतिसाद मिळत नसून यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
विद्यार्थी आणि त्यांचे पालक एक्झाम फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या मारताना दिसतात पण त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान आता या प्रकरणात मुंबई जुनियर कॉलेज शिक्षक संघाने पाठपुरावा सुरू केला आहे.
शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यांनी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांकडे या विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून बारावीच्या परीक्षेत बसण्याची तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी संबंधितांना विनंती पत्र सुद्धा सादर केले आहे.
हे विद्यार्थी नियमित असल्याने त्यांचे फॉर्म कॉलेजकडूनच भरावे लागणार आहेत पण आता कॉलेज बंद आहे त्यामुळे ते विद्यार्थी अडचणीत असून शिक्षण विभागाने यात तातडीने हस्तक्षेप करून या शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचवणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
यामुळे आता शिक्षण विभाग याप्रकरणी काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या बंद पडलेल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षा देता येणार की नाही? हे येत्या काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे.













