IBPS Clerk Prelims चा रिजल्ट लवकरच जाहीर होणार ! कसा अन कुठं पाहणार निकाल, कधी होणार मुख्य परीक्षा ? वाचा डिटेल्स

Published on -

IBPS Clerk Prelims Result 2025 : बँकिंग एक्सामची करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आयबीपीएस च्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) लवकरच आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्सचे निकाल जाहीर करणार आहे.

हे निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाहीर केले जाणार आहेत. अद्याप त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाची लिंक सक्रिय झालेली नाही पण लवकरच ही लिंक सक्रिय होणार आहे.

निकाल लिंक सक्रिय झाल्यानंतर उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून लॉग इन करून त्यांचे गुण तपासू शकतात. 

केव्हा झाली आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स परीक्षा?

आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स परीक्षा गेल्या महिन्यात संपन्न झाली होती. 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025 रोजी IBPS Clerk Prelims परीक्षा आली. दरम्यान या प्रिलिम्समध्ये म्हणजेच पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्यांना आयबीपीएस क्लर्क मेन्स परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

आयबीपीएसची मुख्य परीक्षा ही 29 नोव्हेंबर 2025 रोजी घेतले जाणारा. मुख्य परीक्षेसाठी प्रिलिम्सचे निकाल जाहीर झाल्यानंतर Hall Ticket अर्थात प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे.

आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्सचा निकाल कसा बघायचा?

आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्सचा निकाल ibps.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. यासाठी सर्वप्रथम वेबसाईटला भेट द्या आणि होमपेजवरील IBPS क्लर्क प्रिलिम्स निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.

मग तुमचा अर्ज क्रमांक किंवा रोल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख किंवा पासवर्ड एंटर करावा लागेल. मग सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. या सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल आणि भविष्यातील वापरासाठी तुम्ही तुमचे हे ऑनलाईन गुणपत्रक सेव करू शकता किंवा त्याची प्रिंट आउट काढून पुढील वापरासाठी सांभाळून ठेवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News