2 वर्षापासून जबरदस्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ स्मॉल कॅप कंपनीकडून बोनस शेअर्सची घोषणा ! रेकॉर्ड डेट आताच नोट करा

Published on -

Bonus Share : तुम्ही पण बोनस शेअर्स मध्ये गुंतवणूक करू इच्छित आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड एका स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली असून ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की या स्मॉल कॅप कंपनीकडून बोनस शेअरसाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा फायनल करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला असून यामुळे पुन्हा एकदा या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

स्मॉलकॅप कंपनी रामरत्न वायर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या कंपनीने गेल्या दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत.

या कंपनीने गेल्या दोन वर्षांच्या काळात आपल्या शेअर होल्डर्सला 136% रिटर्न दिले असल्याची माहिती समोर आली असून आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. तसेच यासाठीची रेकॉर्ड डेट पण फायनल करण्यात आली आहे. बोनस इशू साठी 26 डिसेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. 

केव्हा झाला निर्णय

कंपनीच्या संचालक मंडळाने रेकॉर्ड डेटनुसार शेअरहोल्डर्सकडे असलेल्या 5 रुपयांच्या प्रत्येक पूर्ण पेड-अप इक्विटी शेअरसाठी 5 रुपयांचा एक बोनस इक्विटी शेअर जारी करण्यास मान्यता दिली आहे.

बुधवार, 12 नोव्हेंबर 2025 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय झालाय. या कंपनीने 2022 मध्ये सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरच वाटप केले आहे.

त्यावेळी कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर जारी करण्यात आला होता. आता आपण या शेअरची स्टॉक मार्केट मधील सध्याची स्थिती समजून घेऊयात.

शेअरची कामगिरी कशी आहे

गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीचे स्टॉक 136 टक्क्यांनी वाढले आहेत. शुक्रवारी रामरत्न वायर्सचे शेअर्स 0.85 टक्क्यांनी वाढून 636.35 रुपयांवर पोहोचलेत. जुलै 2025 मध्ये, स्टॉक 786.85 वर होता.

हा त्याचा 52 आठवड्याची हाय प्राईस सुद्धा आहे. तसेच त्याची 52 आठवड्याची लो प्राईस 456.80 रुपये आहे. या स्टॉकने तीन वर्षांमध्ये 136% रिटर्न दिले आहेत मात्र मागील तीन महिन्यात कंपनीचे शेअर्स सात टक्के घसरलेत.

गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 9.66% रिटर्न दिले आहेत. तसेच यावर्षी आत्तापर्यंत या शेअरची किंमत 10.73 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच मागील एका महिन्यात कंपनीचे शेअर 3.05 टक्क्यांनी वाढले आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News