कोटक महिंद्रा बँकेचा 15 वर्षानंतर मोठा निर्णय ! 21 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार महत्त्वपूर्ण निर्णय

Published on -

Kotak Mahindra Bank : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक तब्बल 15 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेणार आहे. खरे तर या बँकेची शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोटक महिंद्रा बँकेकडून बोलावण्यात आलेल्या या बैठकीत इक्विटी शेअर्सच्या विभाजनावर म्हणजेच स्टॉक स्प्लिटवर निर्णय घेतला जाणार असल्याचे खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेकडून समोर आली आहे.

कोटक महिंद्रा बँकेने दीड दशकांपूर्वी म्हणजेच 15 वर्षांपूर्वी शेअर्स विभाजनाचा निर्णय घेतलेला होता. आता 15 वर्षांनंतर ही बँक पुन्हा एकदा शेअर्सचे विभाजन करणार आहे.

2010 मध्ये कोटक महिंद्रा बँकेने त्यांचे शेअर्स विभाजित केले होते, ज्यामुळे दर्शनी मूल्य 10 वरून 5 पर्यंत कमी झाले होते. विशेष म्हणजेच स्टॉक स्प्लिट सोबतच आपल्या गुंतवणूकदारांसाठी कोटक महिंद्रा बँकेने दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये बोनस शेअरचे सुद्धा वाटप केले होते.

2015 मध्ये बँकेने 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. सध्या, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. दरम्यान आता येत्या पाच-सहा दिवसांनी होणाऱ्या 

तिमाही निकाल कसे होते?

कोटक महिंद्रा बँकेने अलीकडेच सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत बँकेचा नफा 3 हजार 253 कोटी इतका राहिलाय, जो वार्षिक आधारावर 2.7 कमी आहे.

निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 4% वाढून 7,31 कोटी इतके झाले आहे. तसेच निव्वळ व्याज मार्जिन पण 4.54% राहिलंय. ऑपरेटिंग नफा सुद्धा वार्षिक आधारावर 3% वाढून 5,268 कोटी इतका झालाय.

या तिमाहीत तरतुदी 947 कोटी रुपयाच्या होत्या आणि कर्ज देणाऱ्या बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता पण सुधारली आहे. एकूण एनपीए 6480 कोटी होते, जे आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत 6638 कोटी होते.

शेअर्सची स्थिती कशी आहे ? 

या वर्षात आतापर्यंत या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 16% इतके रिटर्न मिळाले आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 14 नोव्हेंबर रोजी 2075 रुपयावर बंद झालेत. दरम्यान, आता कंपनी स्टॉक स्प्लिट करणार आहे. यामुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe