Tata Sierra ची लॉन्चिंग डेट झाली फायनल ! नव्या कारमध्ये कोणकोणते फीचर्स मिळणार?

Published on -

Tata Sierra Launching Date : नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित एसयूव्ही, टाटा सिएरा पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. या गाडीचे नुकतेच अनावरण पूर्ण झाले असून ही गाडी लवकरच लाँच होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा ही कार 25 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीने या वर्षीच्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्येही ही कार सादर केली. कारच्या इंटीरियरचे फोटो गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यामुळे ही गाडी फारच चर्चेत राहिली आहे. या गाडीची अनेकांना प्रत्यक्ष आहे. दरम्यान त्या गाडीचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्या व्हायरल झालेल्या फोटोवरून असे दिसून येते की इंटीरियरचे प्रमुख आकर्षण म्हणजे ट्रिपल-स्क्रीन सेटअप. महत्वाची बाब म्हणजे टाटा कंपनी हे फीचर्स पहिल्यांदाच आपल्या वाहनात देणार आहे.

या सेटअप मध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मोठी इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि सिंगल ग्लास पॅनलखाली समोरील प्रवाशासाठी स्वतंत्र स्क्रीन एकत्रित केली आहे, ज्यामुळे केबिनला हाय-टेक आणि प्रीमियम फील मिळतो. हा सिग्नेचर लेआउट महिंद्रा XEV 9e ला उजाळा देतो आणि स्वच्छ, मिनिमलिस्ट लूक देतो. हे फिचर्स कियाच्या वाहनांमध्ये देखील दिसून आले आहे. 

कसे राहणार इंजिन 

नवीन टाटा सिएरा दोन ICE पर्यायांसह लॉन्च करण्यात येणार अशी माहिती दिली जात आहे. 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे सुमारे 170 पीएस आणि 280 Nm टॉर्क उत्पादन करेल अशी अपेक्षा आहे. 2.0 लिटर क्रियोटेक डिझेल इंजिन जे ट्यूनच्या स्थितीनुसार सुमारे 170 पीएस आणि 350 Nm उत्पादन करू शकते.

दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे. EV आवृत्तीसाठी ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअप प्रदर्शित करण्यात आला आहे, तर ICE प्रकारात ड्युअल ऑल-व्हील ड्राइव्ह असेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

कसे असतील फिचर्स?

नवीन सिएरा ओमेगा आर्क आर्किटेक्चरवर आधारित राहणार अशी अपेक्षा आहे. यात पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, मोठा हेड-अप डिस्प्ले, अॅम्बियंट लाइटिंग आणि कनेक्टेड कार टेक यांचा समावेश असू शकतो.

सुरक्षेच्या बाबतीत, यात सहा किंवा सात एअरबॅग्ज, ESP, TPMS, EBD सह ABS, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट आणि ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे लेव्हल 2 ADAS सूट असण्याची अपेक्षा आहे.

लाँचच्या वेळी या गाडीच्या फीचर्स बाबत अधिक माहिती मिळू शकणार आहे. ही गाडी 25 नोव्हेंबरला लॉन्च होणार अशी माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe