पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 21 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ रस्त्यांवरील वाहतूक राहणार बंद, कोणते रस्ते बंद राहणार?

Published on -

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी अलीकडेच श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कार्तिकी वारीमुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी काही बदल लागू केले आहेत.

खर तर कार्तिकी वारीला हजारो वारकरी माऊलीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र आळंदी येथे येतात. कार्तिकीला दरवर्षी हजारो वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे श्रीक्षेत्र आळंदी व आजूबाजूच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

या वाहतूक कोंडीमुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि याच पार्श्वभूमीवर आता पुणे वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाच्या महामार्गांच्या वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान आता आपण पुणेकरांसाठी वाहतूक पोलिसांनी कोणते निर्णय घेतले आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक पोलिसांनी घेतलेला हा निर्णय 21 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहे. 

वाहतुकीत कोणते बदल झाले आहेत ?

 पुणे वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडीहून बोपखेल फाट्याद्वारे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

म्हणजेच आता या मार्गावर ज्या जडवाहनांना प्रवास करायचा असेल त्या विश्रांतवाडीकडून येणाऱ्या वाहनांनी येरवडा, खडकी येथील होळकर पुल, जुन्या मुंबई-पुणे या पर्यायी मार्गांचा वापर करायचा आहे.

तसेच नगर रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जावे आणि तेथून पुढे आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचावे असे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नगर रस्त्यावरून तुळापूर फाटा मार्गे आळंदी-मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आळंदीच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना कार्तिकी वारीच्या काळात सुरक्षित आणि वाहतूक कोंडी विरहित प्रवास करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News