Groww IPO : ज्या गुंतवणूकदारांनी ग्रोच्या आयपीओवर नाही ते गुंतवणूकदार सध्या दुःखी आहेत. कारण हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. खरे तर या आयपीओची फार आधीपासून चर्चा सुरू आहे.
दरम्यान IPO आल्यापासून यात गुंतवणूक करणाऱ्यांना आतापर्यंत 48 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाले आहेत. खरेतर ह्या कंपनीची शेअर बाजारात चांगली लिस्टिंग झाली होती. 13 नोव्हेंबर रोजी ग्रोवचा आयपीओ बीएसईवर 14 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला.

ब्रोकरेज कंपनीचे शेअर्स 130.94 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते. ग्रोच्या आयपीओची इश्यू किंमत 100 रुपये प्रति शेअर होती. शुक्रवारी ग्रोच्या शेअर्सची किंमत 153.50 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. पण, काल बाजार बंद होताना ग्रोचा शेअर 148.41 रुपये होता.
म्हणजेच, ग्रोच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 48 टक्के नफा मिळाला आहे. दरम्यान आता आपण या कंपनीच्या शेअर्स बाबत तज्ञांकडून काय सल्ला दिला जातोय याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रोचे शेअर्स आता खरेदी करता येणार का ?
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ग्रो बाबत नक्कीच माहिती असेल. कारण ग्रो ही भारतातील एक आघाडीची ब्रोकरेज फर्म आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत, कंपनीचा बाजार हिस्सा 26.30 आहे.
आर्थिक वर्ष 21 ते आर्थिक वर्ष 25 पर्यंत कंपनीचा सीएजीआर 101.70 ने वाढला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की आजही स्टॉकचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. ग्रोचा आयपीओ वार्षिक उत्पन्नाच्या 34 पट मूल्यांकनावर आला.
एंजल वन आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे मूल्यांकन अनुक्रमे 20 आणि 27 पट आहे. ग्रोची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) 6 हजार 622.30 कोटी होती.
कंपनीने ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे 106 दशलक्ष नवीन शेअर्स आणि 557.2 दशलक्ष शेअर्स जारी केले. याचा आयपीओ 4 नोव्हेंबर रोजी उघडला अन गुंतवणूकदारांना त्याचे शेअर्स 7 नोव्हेंबरपर्यंत ठेवण्याची मुदत होती.
दरम्यान 3 नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ उघडला, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 2984.54 कोटी रुपये उभारलेत.












