‘या’ टायर कंपनीने गुंतवणूकदारांसाठी जाहीर केला 3 रुपयांचा लाभांश ! रेकॉर्ड डेट आताच नोट करा

Published on -

Dividend Stock : देशातील प्रमुख टायर उत्पादक कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. खरेतर, टायर निर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एमआरएफ लिमिटेडने जुलै ते सप्टेंबर 2025 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकालात कंपनीने मजबूत कामगिरी नोंदवली आहे.

महत्वाची बाब म्हणजे तिमाही निकालांसह कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश सुद्धा दिला जाणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय नुकताच घेतला असून  या निर्णयामुळे या कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकस मध्ये आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, MRF कंपनीचा निव्वळ नफा या तिमाहीत 12.3% नी वाढून 455 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीतील निव्वळ नफा 511.6 कोटी रुपये इतका होता.

महसूलाच्या बाबतीतही एमआरएफमध्ये सकारात्मक वाढ दिसली आहे. ह्या कंपनीचा एकूण महसूल 7.2% वाढून 7,249.6 कोटी रुपये झाला. मागील वर्षी हा आकडा 6,760.4 कोटी रुपये होता.

ईबीआयटीडीए देखील या तिमाहीत सुधारला असून तो 12% वाढून 1,090 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे मार्जिन 14.4% वरून 15% पर्यंत पोहोचले आहे, जे एमआरएफच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेतील सुधारणा दर्शवते.

दमदार तिमाही निकाला सोबतच आता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार एमआरएफ लिमिटेड प्रति शेअर 3 रुपये अंतरिम लाभांश वितरित करणार आहे.

या लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख 21 नोव्हेंबर 2025 निश्चित केली असून, लाभांशाचे वितरण 5 डिसेंबर 2025 पूर्वी किंवा नंतर केले जाईल. शेअर बाजाराच्या हालचालींबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीचा शेअर 14 नोव्हेंबर रोजी 1% नी घसरून ₹1,57,000 च्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

सध्या कंपनीचे मार्केट कॅप 66,800 कोटी रुपये आहे. मात्र, दीर्घकालीन परताव्याच्या बाबतीत, गुंतवणूकदारांना शेअरने एका वर्षात 30% आणि एका महिन्यात 14% परतावा दिला आहे. सप्टेंबर 2025 अखेर कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा 27.74% नोंदवला गेला आहे.

वाढता महसूल, मजबूत नफा आणि लाभांशाची घोषणा यामुळे एमआरएफ लिमिटेड आगामी तिमाहीतही स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचे दिसते. थोडक्यात 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये ज्या शेअर होल्डरचे नाव राहणार आहे त्यांना या लाभांशाचा लाभ देण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe