MG च्या ‘या’ गाडीवर मिळतोय 4 लाख रुपयांचा डिस्काउंट ! किती दिवस सुरु राहणार ऑफर? वाचा…

Published on -

MG Car Discount : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी MG कंपनीची गाडी घेणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्यात एमजीच्या काही कार्सवर लाखो रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

खरेतर, दिग्गज ऑटो कंपनी एमजी भारतात विविध सेगमेंटमध्ये वाहने विकत आहे. एमजी कंपनीच्या अनेक गाड्या भारतात लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीच्या काही लोकप्रिय गाड्यांवर या महिन्यात मोठा डिस्काउंट ऑफर सुरु आहे.

यातील काही गाड्यांवर कंपनीकडून चक्क चार लाख रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. अशा परिस्थितीत आज आपण एमजी कंपनीच्या कोणत्या गाड्यांवर सध्या मोठा डिस्काउंट मिळतो याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या वाहनांवर मिळतोय सर्वाधिक डिस्काउंट 

MG Gloster – एमजी कंपनीच्या या गाडीवर कंपनीकडून सर्वाधिक डिस्काउंट मिळतोय. या गाडीवर कंपनी चार लाख रुपयांचा डिस्काउंट देत असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा पण लाभ सामील आहे. फुल साईज SUV खरेदी करणाऱ्यांसाठी नक्कीच ही एक मोठी संधी ठरणार आहे.

MG ZX EV – एमजी झेडएस ईव्ही इलेक्ट्रिक ही कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही आहे. या गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद पण मिळतोय. दरम्यान आता या गाडीवर कंपनीकडून 1.25 लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

मात्र ही ऑफर फक्त बेस मॉडेलवर लागू आहे. विशेष म्हणजे इतर व्हेरिएंटवर कंपनीकडून 49 हजार रुपयांचा लॉयल्टी आणि कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जातोय. 

एमजी हेक्टर – एमजीच्या मध्यम आकाराची एसयूव्ही हेक्टरवर पण मोठा डिस्काउंट मिळतोय. या गाडीवर कंपनीकडून 90 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. ही देखील एक लोकप्रिय SUV आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या महिन्यात ही गाडी खरेदी करू शकता.

कारण तुम्ही या महिन्यात ही गाडी खरेदी केली तर तुम्हाला 90000 पर्यंतचा लाभ मिळणार आहे. या एसयूव्हीच्या काही प्रकारांवर कंपनीकडून 65 हजारापर्यंतच्या ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe