Premanand Maharaj Darshan : संत प्रेमानंद महाराज यांचे हजारो चाहते आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी सिनेसृष्टीतील कलाकार, तसेच क्रिकेटर, गायक अभिनेते हजेरी लावतात. दरम्यान जर तुमचीही प्रेमानंद महाराज यांना भेटण्याची इच्छा असेल किंवा त्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
तुम्ही जर पहिल्यांदाच वृंदावनला भेट देत असाल आणि प्रेमानंद महाराजांना भेटण्याची तुमची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी नेमके काय करावे लागेल याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

खरेतर, प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात दररोज हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. मात्र, प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
कारण की प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या भाविकांची आश्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता आश्रमात दर्शन आणि भेट दोन्ही साठी काही नियम आणि कायदे तयार करण्यात आले आहेत.
प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठीचे नियम
प्रेमानंद महाराजांच आश्रम उत्तर प्रदेश मधील मथुरेच्या वृंदावनात स्थित आहे. श्री हित राधा केली कुंज येथे हे आश्रम आहे. हे आश्रम परिक्रमा मार्गावर आहे आणि वराह घाट जवळच आहे.
आता तुम्ही इथं कस पोहचणार ? जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर सर्वात जवळचे स्टेशन मथुरा जंक्शन आहे. जे आश्रमापासून अंदाजे 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. मथुरा जंक्शन वर उतरल्यानंतर तुम्हाला या आश्रमात पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी सहज मिळेल.
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दररोज हजारो भाविक येतात. त्यामुळे तुम्ही महाराजांच्या दर्शनासाठी सकाळीच जायला हवे, कारण तेव्हा कमी गर्दी राहते. आरती आणि वाणी पठण संध्याकाळी पण होते, मात्र सायंकाळी गर्दी सकाळपेक्षा जास्त असते.
भाविकांना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्रवेश दिला जातो. दर्शन साधारणतः आठ वाजेला सुरू होते. यानंतर मग शृंगार आरती आणि वाणी पठण केले जाते जे की सकाळी सव्वा आठ ते सव्वा नऊ दरम्यान होते.
जर महाराजांसोबत तुम्हाला वैयक्तिक भेट घ्यायची असेल तर यासाठी आश्रम मध्ये टोकन सिस्टम आहे. सकाळी 9 वाजेपासून ते साडेनऊ वाजेपर्यंत टोकन वाटले जातात. पण यासाठी कृपया तुमचे आधार कार्ड सोबत ठेवा.
टोकन सहसा दुसऱ्या दिवसाच्या संभाषणापर्यंत वैध असते. लक्षात ठेवा की टोकन मर्यादित संख्येत दिले जातात, म्हणून लवकर येऊन रांगेत सामील होणे चांगले राहणार आहे.













