कबुतरांना घरापासून लांब पळवण्यासाठीच्या 5 सोप्या ट्रिक्स ! परत कधीच तुमच्या बाल्कनीत कबुतर दिसणार नाही…

Published on -

Pigeon Prevention : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे अशा महानगरांमध्ये कबूतरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्यांचा उपद्रवही दिवसेंदिवस जाणवू लागला आहे. मागे मुंबईत या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण तापलं होतं. कबूतरखाणे बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन धर्मीय आक्रमक झाले होते. खरेतर, राजधानी मुंबईसारख्या शहरात अपार्टमेंटच्या बाल्कनी, खिडक्या आणि छतांवर कबूतरांची वस्ती वाढल्याने केवळ घाणच तयार होत नाही, तर विविध बॅक्टेरिया आणि एलर्जीजन्य समस्या उद्भवण्याचा धोका देखील वाढतो.

ही समस्या फक्त मुंबईतच आहे असे नाही तर इतरही छोट्या-मोठ्या शहरांमध्ये आपल्याला कबुतरांची समस्या पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर आपल्या घराला आणि कुटुंबातील सदस्यच्या आरोग्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय करणे अत्यावश्यक झाले आहे. दरम्यान आज आपण कबुतरांना आपल्या घरापासून लांब ठेवण्यासाठी आपण कोण कोणते उपाय करू शकतो याबाबत माहिती पाहणार आहोत.

विशेष म्हणजे आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते फारच सोपे आहेत आणि यामुळे कबुतरांना कोणतीच हानी सुद्धा होणार नाही. हे उपाय कबुतरांना ठेवतील घरापासून लांब काही सुगंधित वनस्पतींचा वापर – तुम्ही कबुतरांना घरापासून लांब ठेवण्यासाठी तुलसी, पुदीना, लेमनग्रास यांसारख्या झाडांचा वापर करू शकता. कारण या वनस्पतीचा वास कबूतरांना पसंत नसतो. त्यामुळे अशा वनस्पती बाल्कनीमध्ये ठेवणे हा एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे. यामुळे वातावरण स्वच्छ राहते आणि कबूतर त्या भागाजवळ येण्याचे टाळतात.

पाण्याचा नियमित छिडकाव – याशिवाय आणखी एक सोपा उपाय म्हणजे पाण्याचा नियमित वापर करणे. खरेतर, कबूतर ओल्या पृष्ठभागावर बसणे टाळतात. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी बाल्कनीवर हलक्या प्रमाणात पाण्याचा छिडकाव केला तर कबूतर दूर राहतात. हा पर्यावरणपूरक आणि सुरक्षित उपाय असल्यामुळे अनेक रहिवासी हा उपाय नियमित अवलंबतात.
ध्वनी यंत्रांचा वापर – प्राण्यांची ऐकण्याची क्षमता अधिक असते. आपल्याला जे ऐकू येत नाही ते सुद्धा पशुपक्षी ऐकू शकतात.

कबुतरांची देखील ऐकण्याची क्षमता अधिक असते आणि यामुळे आपण काही दोन्ही यंत्र तयार करून कबूतर घरापासून लांब ठेवू शकतो. काही विशेष ध्वनी निर्माण करणारी उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. ही यंत्रे मानवाला ऐकू न येणारी, परंतु कबूतरांना त्रासदायक अशी ध्वनी तरंग निर्माण करतात. यामुळे कबूतर त्या जागी थांबत नाहीत आणि बाल्कनी स्वच्छ राहते. इतर प्राकृतिक उपाय – नीम तेल, सिरका किंवा मिरची पावडर मिसळून केलेले द्रावण बाल्कनीत फवारल्यास कबूतर दूर राहतात.

हे उपाय आरोग्यास सुरक्षित आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेले असल्याने अनेक नागरिक याचा वापर करत आहेत. रेलिंगवर जाळी किंवा स्पाईक्स बसवा – कबूतरांना बसण्यापासून रोखण्यासाठी रेलिंगवर जाळी किंवा स्पाईक्स बसवणे अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. हे साहित्य सहज मिळते आणि ते बसवणेही सोपे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News