गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ 4 कंपन्या देणार लाभांश, रेकॉर्ड डेट आताच नोट करा

Published on -

Dividend Stock : आजपासून सुरु झालेला नोव्हेंबरचा हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी विशेष खास ठरणार आहे. गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात 4 मोठ्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करणार आहे.

या लाभांशची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात येत असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. दरम्यान आता आपण कोणत्या 4 कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार याविषयी सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

या कंपन्या देणार लाभांश

MRF : देशातील सर्वात मोठ्या टायर कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स साठी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. टायर कंपनी एमआरएफने त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केला आहे. याची रेकॉर्ड डेट सुद्धा याच आठवड्यात आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने यासाठीची एक्स-डिव्हिडंड तारीख 21 नोव्हेंबर निश्चित केली असल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे.

Info Edge : नोकरी डॉट ची मूळ कंपनी इन्फो एज सुद्धा या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी लाभांश दिला आहे. या आठवड्यात सुद्धा या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2.40 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

यासाठीची रेकॉर्ड डेट 21 नोव्हेंबर सेट करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये ज्या गुंतवणूकदारांचे नाव असेल त्यांना या लाभांशाचा लाभ वितरित करण्यात आला आहे. 

Oil India : ऑईल इंडिया या सरकारी मालकीच्या तेल कंपनीने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. ऑइल इंडिया प्रति शेअर 3.5 रुपये लाभांश देणार असे संचालक मंडळाने सांगितले आहे.

यासाठी कंपनीने 21 नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख सेट केली आहे. यामुळे जर तुम्हाला या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल तर 20 नोव्हेंबर पर्यंत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. 

IRCTC : सप्टेंबर तिमाहीत चांगला नफा कमवल्यानंतर आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने आपल्या शेअर होल्डर्सला लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी प्रति शेअर 5 रुपये लाभांश देणार आहे. या साठीची रेकॉर्ड डेट कंपनीने 21 नोव्हेंबर निश्चित केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News