Maruti Celerio CNG खरेदीसाठी एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?

Published on -

Maruti Celerio CNG EMI : तुम्ही पण नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. ही बातमी Maruti Celerio चे CNG वेरियंट खरेदी करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरे तर मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारे आणि कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते.

या कंपनीच्या अनेक गाड्या आपल्याला रस्त्यांवर दिसतात. कंपनीचे अनेक मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे मारुती सेलेरिओ. ही गाडी सीएनजी व्हेरिएंट मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

त्यामुळे जर तुम्हीही पेट्रोल डिझेलच्या त्रासाला कंटाळा आला असाल आणि सीएनजी कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मारुती सिलेरियोचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

दरम्यान आज आपण या लोकप्रिय कारचे सीएनजी व्हेरियंट ईएमआयवर खरेदी करायचे असल्यास एक लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटवर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार याचे गणित समजून घेणार आहोत. 

Maruti Suzuki Celerio CNG ची किंमत किती आहे?

मारुती सुझुकीची हॅचबॅक कार मारुरी सेलेरियोला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. याचे सीएनजी व्हेरियंट 5.98 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सर्वात स्वस्त सीएनजी कार च्या यादीत सुद्धा समाविष्ट आहे.

त्यामुळे कमी किमतीत सीएनजी गाडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय बेस्ट राहणार आहे. पण दिल्लीमध्ये या गाडीची ऑन रोड किंमत 6.88 लाख रुपये आहे. ऑन रोड प्राईस मध्ये 57 हजार रुपये आरटीओचा खर्च, विम्याचे 32 हजार रुपये व इतर काही खर्च समाविष्ट असतात. 

एक लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हफ्ता भरावा लागणार?

जर तुम्ही या गाडीच सीएनजी व्हेरियंट खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल आणि यासाठी तुम्हाला लोन घ्यायचे असेल तर कोणत्याही बँकेकडून तुम्हाला एक्स शोरूम किमतीवर कर्ज पुरवठा केला जाणार आहे.

अर्थात एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ही गाडी खरेदी करण्यासाठी 5.88 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होणार आहे. आता समजा बँकेकडून तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने 5.88 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9460 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच तुम्हाला सात वर्षांच्या काळात सात लाख 94 हजार 640 रुपये भरावे लागतील. अर्थातच ग्राहकाला 2,6,640 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News