अखेर सरकारने तो निर्णय घेतलाच…..! लाडक्या बहिणींना एकाच वेळी मिळाल्यात दोन मोठ्या Good News ; ‘या’ 2 मागण्या झाल्यात मान्य

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर नुकतीचं मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. या योजनेमुळेच महायुती सरकार आज आपल्याला पाहायला मिळतंय असं म्हटलं तर काही शोकांतिका ठरणार नाही.

कारण की, लाडकी बहिण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला आहे आणि हीच बाब लक्षात घेता आज महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात.

ही योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील एकूण 16 हप्ते देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यात की याचा पुढील हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेबाबत आता एक महत्त्वपूर्ण निर्णय झालाय. जसं की आपणास ठाऊकच आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत होती मात्र आता सरकारने या मुदतीत वाढ करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे.

सरकारने केवायसी साठी दोन महिन्याची मुदत दिली होती आणि ही मुदत 18 नोव्हेंबर रोजी संपत होती यामुळे केवायसी साठी मुदतवाढ मिळणार की नाही हा मोठा सवाल होता कारण की कोट्यावधी लाभार्थ्यांची केवायसी अजूनही प्रलंबित आहे. यामुळे जर केव्हायसी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली नसती तर या सर्व महिला या योजनेतून वगळल्या गेल्या असत्या आणि साहजिकच याचा फटका महिलांना तर बसलाच असता पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला सुद्धा बसला असता.

दरम्यान हेच कारण आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांची नाराजगी जड भरू नये यासाठी फडणवीस सरकारने केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची माहिती स्वतः अदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हॅन्डलवर दिलेली आहे.

यानुसार केवायसी प्रक्रियेला आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. विशेष म्हणजे केवायसी प्रक्रियेतील एक मोठी अडचण पण दूर झाली आहे. केवायसी करण्यासाठी पती किंवा वडील यांचे आधार कार्ड पडताळणी करावी लागते. पण ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे कशाला आभार त्यांना केवायसी करताना अडचण येत होती.

पण आता त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करून व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

आदिती तटकरे यांनी काय सांगितले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ!

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.

परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News