Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात पण नवग्रहातील काही ग्रह जलद गतीने चालतात. म्हणजे त्यांचे नक्षत्र आणि राशी परिवर्तन जलद गतीने होते आणि चंद्र हा सर्वात जलद गतीने चालणारा ग्रह.
दरम्यान येत्या तीन दिवसांनी चंद्रग्रहणाचे पुन्हा एकदा राशी परिवर्तन होणार आहे आणि या घटनेचा राशीच एकरातील काही राशीच्या लोकांवर मोठा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी माहिती ज्योतिष तज्ञांकडून देण्यात आली आहे. तीन दिवसांनी अर्थातच 20 नोव्हेंबर 2025 रोजी चंद्रग्रह वृश्चिक राशी प्रवेश करणार आहे.

पहाटे चार वाजून तेरा मिनिटांनी चंद्र ग्रहाचे हे राशी परिवर्तन होणार असून या राशी परिवर्तनाचा तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडणार आहे. चंद्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा परिणाम म्हणजे मंगळ, बुध आणि सूर्य यांच्याशी युती होऊन एक शक्तिशाली चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
या लोकांना मिळणार अनेक फायदे
वृषभ – या राशीच्या लोकांचा लवकरच सुवर्णकाळ सुरू होणार आहे. आता दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे गती घेणार आहेत. या लोकांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे तणाव आता कमी होतील. परिवारात आनंददायी वातावरण निर्माण होईल.
मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल. करिअरवाईज काळ चांगला राहील. नोकरीसंबंधित प्रवास तुमच्यासाठी भविष्यातील मोठ्या संधी घेऊन येईल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल दिसून येतील.
तुळ – या राशीच्या लोकांचे पण नशीब चमकणार आहे. या लोकांना व्यावसायिक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस मध्ये या लोकांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. चतुर्ग्रही योगामुळे अचानक आर्थिक लाभ होणार आहे.
कला, सौंदर्य, सर्जनशीलता आणि सरकारी नोकरीच्या क्षेत्रात या लोकांना मोठ्या संधी उपलब्ध होतील असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मोठ्या फायद्याचा राहणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क्स मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल मानला जात आहे.
वृश्चिक – या लोकांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सोबतच या लोकांचे धैर्य पण वाढणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित कामे सुद्धा पूर्ण होणार आहेत. नवीन उत्पन्नस्रोत निर्माण होतील आणि संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकांसाठी पण हा काळ बेस्ट राहणार आहे. हा काळ नोकरदार वर्गासाठी देखील फायद्याचा राहू शकतो. नोकरदार लोकांना पदोन्नतीची भेट मिळू शकते.













