SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक. या बँकेत आपल्यापैकीही अनेकांचे अकाउंट असेल. दरम्यान जर तुमचेही एसबीआय मध्ये अकाउंट असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ते अपडेट असे की एसबीआय एक डिसेंबर 2025 पासून एक महत्त्वाचा आणि सर्वसामान्य ग्राहकांवर परिणाम करणारा बदल करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वात मोठी बँक आपली एक लोकप्रिय पेमेंट सुविधा बंद करण्याच्या निर्णयात आहे. ही पेमेंट करण्याची सुविधा एक डिसेंबर 2025 पासून बंद होईल आणि याचा सर्वसामान्य एसबीआयच्या ग्राहकांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

एसबीआय 1 डिसेंबर 2025 पासून ‘mCASH’ ही सुविधा बंद करणार असल्याची माहिती बँकेकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान आता आपण नेमकी ही सुविधा काय होते आणि कशी काम करायची याबाबत माहिती पाहूयात.
एसबीआयची mCASH सेवा ग्राहकांना UPI सारखे पेमेंट करण्याची सुविधा देत होती. या सुविधेचा वापर करून एसबीआयच्या ग्राहकांना जलद आणि सोप्या पद्धतीने पैसे पाठवता येत होते आणि यामुळे अनेकजण ही सुविधा वापरतात.
मात्र आता ही सुविधा फक्त 30 नोव्हेंबर पर्यंत वापरता येणार आहे कारण की त्यानंतर ही सेवा कायमची हद्दबाहेर होईल. याचा एसबीआयच्या असंख्य ग्राहकांवर परिणाम होणार आहे यात शंकाच नाही.
खरे तर एसबीआयकडून जी सेवा सुरू झाली आहे त्या सेवेच्या वापराने फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून देखील आर्थिक व्यवहार पूर्ण करता येतोय. यामुळे ग्राहकांना पैशांचे व्यवहार विशेषतः छोटे व्यवहार जलद गतीने पूर्ण करता येत होते आणि यामुळे या सेवेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.
वास्तविक हे फीचर लहान आणि तातडीचे पेमेंट करण्यासाठी फारच उपयुक्त होते. पण, आता हे फिचर एसबीआयने काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि बँकेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
बँकेने सांगितल्याप्रमाणे 30 नोव्हेंबर 2025 नंतर एसबीआयच्या ग्राहकांना mCASH द्वारे पैसे पाठवणे आणि ते क्लेम करणे ही सुविधा बंद होणार आहे. OnlineSBI आणि YONO Lite या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा बंद होणार असे बँकेने स्पष्ट केले आहे. mCash हे जुने तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले होते.
यामुळे बँकेने हे फीचर बंद केले असून आता आधुनिक आणि अधिक सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने यावेळी ग्राहकांना UPI, IMPS, NEFT, आणि RTGS सारख्या अधिक आधुनिक आणि सुरक्षित पेमेंट पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे.













