नवीन टाटा सिएरा 25 नोव्हेंबरला होणार लाँच ! स्पोर्टी डिझाइनसह मिळणार हे टॉप प्रीमियम फीचर्स

Updated on -

Tata Sierra News : टाटा मोटर्स भारतीय बाजारात आपली आयकॉनिक SUV टाटा सिएरा आधुनिक रूपात पुन्हा एकदा सादर करण्यास सज्ज झाली आहे. कंपनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी या गाडीचे अधिकृत लाँच करणार असून अलीकडेच प्रदर्शित करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये अनेक प्रीमियम आणि फ्यूचरिस्टिक फीचर्सचा समावेश असल्याचे दिसून आले. नवी सिएरा डिझाईन, तंत्रज्ञान आणि कम्फर्टच्या बाबतीत आपल्या सेगमेंटमध्ये नवे मापदंड निश्चित करणार आहे.

नवीन सिएरामध्ये सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे दिलेला ट्रिपल-स्क्रीन सेटअप. यात १२.३-इंचांच्या दोन टचस्क्रीन आणि 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. हा सेटअप तिला AI-इंटरफेससह अधिक प्रगत आणि प्रीमियम अनुभव प्रदान करतो.

सुरक्षिततेसाठी यात लेव्हल-२ ADAS पॅकेज दिले जाणार असून ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन कीप असिस्ट आणि अडॅप्टिव क्रूज कंट्रोलसारखे फीचर्स मिळतील.

इंटीरियरच्या बाबतीतही नवी सिएरा अत्यंत समृद्ध आहे. पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-टोन लेदरेट अपहोल्स्ट्री, अॅम्बिएंट लाइटिंग आणि सॉफ्ट-टच मटेरियल केबिनला प्रीमियम फील देतात.

लांब प्रवासासाठी एडजस्टेबल अंडर-थाय सपोर्ट, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस Android Auto / Apple CarPlay, वायरलेस चार्जिंग यांचा समावेश आहे. ड्रायव्हरसाठी मेमरी फंक्शनसह पावर्ड सीट आणि ईझी एंट्री/एग्झिट फीचरही देण्यात येणार आहे.

नवीन सिएरामध्ये १.५-लिटरचे तीन वेगवेगळे इंजिन ऑप्शन दिले जाण्याची शक्यता आहे—टर्बो पेट्रोल, NA पेट्रोल आणि टर्बो डिझेल. मनोरंजनासाठी JBL + Dolby Atmos सपोर्ट असलेली १२-स्पीकर सिस्टम दिली जाणार आहे. रियर ओव्हरहँग लांब असल्याने यामध्ये एक्स्ट्रा-लार्ज बूटस्पेस मिळण्याची शक्यता आहे.

बाह्य डिझाइनमध्ये तीक्ष्ण LED लाईटिंग, फ्लश डोअर हँडल्स, अल्पाइन विंडोज आणि १९-इंच अलॉय व्हील्ससह नवी सिएरा आणखीच स्पोर्टी आणि दमदार भासते. २५ नोव्हेंबरला या कारचे लाँच होताच ती भारतीय SUV बाजारात मोठी क्रांती घडवू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News