महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी ! 2179 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या त्या जिल्ह्यांना होणार थेट फायदा

Published on -

Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रेल्वेमार्गांचा प्रचंड विस्तार झाला आहे. देशात अनेक नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पण गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये मोठमोठे रेल्वे मार्ग विकसित झाले असून याचा विविध जिल्ह्यांना फायदा झाला आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्हे लाभान्वित होणार आहेत. खरंतर केंद्रातील सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाचा मराठवाडा विभागाला सर्वाधिक फायदा होणार आहे.

या निर्णयामुळे रेल्वे वाहतूक आणखी वेगवान होईल आणि राज्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर ते परभणी या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिलेली आहे.

हा प्रकल्प 2179 कोटी रुपयांचा असून यामुळे छत्रपती संभाजीनगर ते परभणी हा प्रवास वेगवान होणार आहे. हा दुहेरीकरणाचा प्रकल्प या भागातील कृषी शिक्षण उद्योग अध्यात्म पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी नवसंजीवनी देणारा ठरेल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.

या प्रकल्पामुळे फक्त छत्रपती संभाजी नगर ते परभणी हा प्रवास वेगवान होईल असे नाही तर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या तुलनेने कमी विकसित जिल्ह्यांच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने या प्रकल्पासाठी 2179 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प 177.79 किलोमीटर लांबीचा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी ऑगस्ट 2025 मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी जमीन संपादनासाठी प्राथमिक अधिसूचना पण जारी करण्यात आली.

दरम्यान या प्रकल्पासाठी जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून 21 नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत. या रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी, संपादन प्रक्रिया, बाधित जमीन मालकांना मोबदला वितरण पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

निविदा फायनल झाल्यानंतर मग प्रत्यक्षात या प्रकल्पासाठी वर्कऑर्डर निघेल आणि याचे काम सुरू होणार आहे. अर्थात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. त्याचे प्रत्यक्ष बांधकाम पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्येच सुरू होणार आहे. तत्पूर्वी आता आपण या प्रकल्पाचे फायदे कोणकोणते आहेत याची माहिती घेऊयात.

प्रकल्पाचे फायदे

केंद्र सरकारकडून मंजुरी प्राप्त झालेल्या या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रवास वेगवान होणार आहे. संबंधित जिल्ह्यातील कृषी आणि उद्योग क्षेत्राला या प्रकल्पामुळे सर्वाधिक लाभ मिळणार आहे.

हा दुहेरीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाला की मालवाहतुकीसाठी एक स्पेशल ट्रॅक खुला होणार आहे आणि साहजिकच याचा या भागातील विकासाला फायदा होईल. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड–नांदेड रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाला चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News